
crime (फोटो सौजन्य: social media)
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी फेकलं नदीत
२७ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पोलीस पाटील शरद वळवी याना नदीपात्रात नवजात बालकाचा मृतदेह आढळला.अज्ञात पालकांनी बाळाच्या जन्माची माहिती लपवण्यासाठी आणि मृतदेहाची गुप्त व्हिलेवात लावण्यासाठी ते नदीत फेकल्याचे प्राथमिक समोर आले आहे. संबंधित घटना वणव्यासारखी गावभर पसरली आणि घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली.
अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस पाटील शरद भरत वळवी यांच्या तक्रारीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 94 आणि 3(5) अंतर्गत अज्ञात आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे. अश्या प्रकारच्या निर्दयी कृत्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी लवकरात लवकर दोषींना शोधून न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आदिवासी आश्रम शाळेत आठवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार! मुख्याध्यापकासह महिला अधीक्षक निलंबित
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासीं आश्रम शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात असणाऱ्या धडगाव तलई इथल्या आश्रम शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र नराधम मुख्याध्यापकाला महिला अधीक्षकाने सहकार्य केल्याचं समोर आल आहे. त्यामुळे महिलेला पण या प्रकरणात आता निलंबन करण्यात आल आहे.
बाहेर सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी
मुख्यध्यापकाने मुलीवर अत्याचार केला आणि त्या नंतर तिला धमकी पण देण्यात आली. जर ही गोष्ट कोणाला सांगतली तर तुला जीवे मारू अशी थेट धमकी त्याच्या कडून देण्यात आली. मुलीने हा सगळा घडला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. त्या नंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणात मुख्याध्याप रायसिंग वसावे, आणि व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारात महिला अधीक्षकांची मुख्याध्यापक यांच्याशी संगनमत झाल. महिलेवर संगन मत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तिच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी मुख्यालय न सोडण्याचे आदेश जारी केले आहेत.
Ans: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात, सोरापाडा गावाजवळील वरखेडी नदीपात्रात.
Ans: सुमारे 6 ते 7 महिन्यांचे पुरुष जातीचे अर्भक असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
Ans: अज्ञात पालकांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून दोषींचा शोध घेतला जात आहे.