प्राजक्ता माळीची 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता ऐकली का ? पाहा Video
अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. प्राजक्ता माळी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून सिनेनिर्माती, कवियित्री आणि बिझनेसवुमनही ती आहे. इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, की ज्या अभिनेत्रीही आहेत आणि बिझनेसबवुमनही आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ता माळी हिने २०२३ मध्ये ‘प्राजक्ताराज’ नावाचा दागिन्यांचा ब्रँड लाँच केला. अभिनेत्रीच्या दागिन्यांच्या ब्रँड लाँचिंगच्या इव्हेंटवेळी अभिनेत्रीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लाँच केला होता. दागिन्यांच्या ब्रँड लाँचिंगच्या इव्हेंटवेळी प्राजक्ताने आपल्या दागिन्यांच्या ब्रँडला ‘प्राजक्तराज’ हे नाव का दिलं, याचं कारण सांगितलं. जाणून घेऊया नेमकं कारण काय आहे…
अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ या दिवशी होणार प्रदर्शित, ‘भुल भुलैय्या’ पेक्षा जास्त खतरनाक हा चित्रपट!
दागिन्यांच्या ब्रँड लाँचिंगच्या इव्हेंटवेळी प्राजक्ताने माध्यमांसोबत संवाद साधताना सांगितले की, “माझ्या दागिन्यांच्या ब्रँडचं नाव ‘प्राजक्त साज’ असं असावं, असं अनेकांचं मत होतं. पण खूप साधं आणि सोप्प होईल, असं माझं म्हणणं होतं, म्हणून मी ते निवडलं नाही. खरंतर, ‘राज’ या शब्दातच श्रीमंती आहे. हुकूमत आहे, घरंदाजपणा आहे आणि मुख्य म्हणजे ताकद आहे…. वैभव, लक्ष्मी हे शब्द आहेत, पण राजवैभव, राजलक्ष्मी म्हटलं की चित्र बदलतं, राजबिंडा म्हणतो, राजेशाही, राजवाडा असतो.. हा शब्द पलिकडे लावला तरी तितकाच ग्रँडनेस येतो.. धनराज, कविराज, रसराज, स्वरराज, सरकारराज तसं ‘प्राजक्तराज’… ‘प्राजक्तप्रभा’ जसा काव्यसंग्रह होता, तसं ‘प्राजक्तराज’…” अशी ब्रँडच्या नावामागची कहाणी प्राजक्ताने सांगितली होती.
‘बेबी जॉन’मध्येही ॲटलीने बदलला नाही पॅटर्न? SRK सोबत वरुण धवनची होतेय तुलना!
प्राजक्ताकडून ‘राज’ या शब्दाचा अर्थ कळाल्यानंतर राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, “प्राजक्ता यांनी ज्यावेळी सांगितलं, की असा कार्यक्रम आहे, त्यांच्या नवीन उद्योगाचं उद्घाटन करायचं आहे, मी पत्नी शर्मिलाला सांगितलं, आपण सोबत जाऊ… मराठी संस्कृतीशी निगडीत कार्यक्रम असल्यामुळे मी येणं स्वाभाविक आहे. परंतु दागिने हा काही माझा विषय नाही, त्यामुळे मी माझ्या पत्नीलासोबत आणलं आणि ती येणं गरजेचं आहे. विश्वासरावांनी सांगितलेली दागिन्यांची नावं मी आजवर केव्हाच ऐकलेली नाहीत. मला त्याबद्दल माहितही नव्हतं. एक तर दागिने म्हणून माहिती नाही, मराठी संस्कृतीत या गोष्टी मागे पडून आता कुणी वापरत नाही.”
विशेष म्हणजे, यासाठी मी प्राजक्ता माळी यांचे मी आभार मानेल. त्यांनी या गोष्टी एक बिझनेसवुमन म्हणून दागिन्यांच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रासमोर आणल्या. मराठीत लोप पावलेल्या दागिन्यांचा ब्रँड तयार केला. पण या दागिन्यांनाही प्राजक्ता नावाचा ब्रँड हवा होता. तो आज प्राजक्ता माळीच्या नावे महाराष्ट्रभर पसरेल. ‘प्राजक्तराज’ हे नाव दागिन्यांच्या ब्रँडचं का ठेवलं ? हे त्यांनी सांगितलं. प्रत्येक गोष्टीच्या आधी राज असतो किंवा नंतर राज असतो. माझं घर बनायच्या आधी सांगितलं असतं तर मी राजभवन तरी घेतलं असतं, पण ही संस्कृती तुम्ही जोपासताय, वाढवताय, याचा आनंद आहे…” अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.