Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Spand Antariche Song Out : जुन्या आठवणींमध्ये रममाण करणारे ‘स्पंद अंतरीचे…’ गाणं रिलीज, प्रियदर्शनी इंदलकर दिसणार अनोख्या भूमिकेत

कपाटावरून ५० वर्षांपूर्वीचा जुना अल्बम काढला की, काही क्षण का होईना तो अल्बम आपल्याला त्या काळात घेऊन जातो. मग नकळत त्या आठवणींमध्ये आपण रमतो. सेच जुन्या आठवणींमध्ये रममाण करणारे 'स्पंद अंतरीचे...' हे प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 01, 2024 | 08:54 PM
जुन्या आठवणींमध्ये रममाण करणारे 'स्पंद अंतरीचे...' गाणं रिलीज

जुन्या आठवणींमध्ये रममाण करणारे 'स्पंद अंतरीचे...' गाणं रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

Spand Antariche Song Released : कपाटावरून किंवा एखाद्या संदुकीतून ५० वर्षांपूर्वीचा जुना अल्बम काढला की, काही क्षण का होईना तो अल्बम आपल्याला त्या काळात घेऊन जातो. मग नकळत त्या आठवणींमध्ये आपण रमतो. काही आठवणी नव्याने उलगडतात. त्या फोटोंवरून हात फिरवताना कित्येक वर्षं पुन्हा जगली जातात. असेच जुन्या आठवणींमध्ये रममाण करणारे ‘स्पंद अंतरीचे…’ हे प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हे देखील वाचा – गाणं गाताना हॉलिवूड रॅपर स्टेजवरच कोसळला, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

केदार जोशी, अभय अनंत कोर्डे निर्मित, या गाण्याचे दिग्दर्शन तेजस नेरुरकर यांनी केले आहे. प्रियदर्शिनी इंदलकर हिच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या सुंदर गाण्याला शमिका भिडे हिचा सुमधुर आवाज लाभला असून अभय अनंत कोर्डे यांचे गीत, संगीत लाभलेल्या या गाण्याला अमित पाध्ये यांचे संगीत नियोजन आहे. कृष्णधवल सिनेमाच्या जमान्यातील बऱ्याच गाण्यांनी पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. ती गाणी, त्यातील साधेपणा स्वप्नवत वाटणारा असतो. असेच जुन्या आठवणींना उजाळा देणारे हे गाणे मनातील हितगूज व्यक्त करणारे आहे.

गाण्याबद्दल निर्माते केदार जोशी, अभय अनंत कोर्डे म्हणतात, “धावपळीत गुंतलेल्या मनावर शांततेची हळुवार फुंकर घालणारे हे गाणे असून घड्याळालाही मागे टाकेल इतक्या सुपरफास्ट स्पीडमध्ये चाललेल्या आजच्या युगात, थोडं थांबवून कृष्णधवल छटांमध्ये काही काळ घेऊन जाण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. यात प्रियदर्शिनीचा सहजसुंदर अभिनय पाहायला मिळेल. या गाण्याचे दिग्दर्शन तेजस नेरुरकर या प्रसिद्ध फोटोग्राफरने केले असून पदार्पणातच इतके कमाल दिग्दर्शन करणे, निश्चितच कौतुकास्पद आहे. आम्हाला खात्री आहे. हे गाणे प्रत्येकाच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल.”

हे देखील वाचा – बॉलिवूड पाहून आलाय कंटाळा? मग हा घ्या हॉलिवूडचा खजाना

तर तेजस नेरुरकर म्हणतात, “सिनेमॅटोग्राफी बऱ्याच वेळेला करायला मिळते पण या गाण्याच्या माध्यमातून परत एकदा दिग्दर्शनाचा प्रयत्न करून पहिला आहे. टीम खूप छान असल्यामुळेच अनेक अडथळे येऊनही शूटिंग व्यवस्थित झाले.”

Web Title: Actress priyadarshini indalkar spand antariche new marathi love song released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 08:54 PM

Topics:  

  • actress priyadarshini indalkar
  • marathi actress

संबंधित बातम्या

मालेगाव अत्याचार प्रकरणी या मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “४ वर्षाच्या मुलीवर हे राक्षसी कृत्य…”
1

मालेगाव अत्याचार प्रकरणी या मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “४ वर्षाच्या मुलीवर हे राक्षसी कृत्य…”

”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!
2

”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!

”यापेक्षा मोठं भाग्य नाही..” संभवामी युगे युगे’वर बोलताना अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केल्या भावना व्यक्त, म्हणाली…
3

”यापेक्षा मोठं भाग्य नाही..” संभवामी युगे युगे’वर बोलताना अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केल्या भावना व्यक्त, म्हणाली…

‘माझा १२ वर्षांचा मुलगा…’ ब्लू साडी गर्लचे एआय फोटो व्हायरल, अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
4

‘माझा १२ वर्षांचा मुलगा…’ ब्लू साडी गर्लचे एआय फोटो व्हायरल, अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.