अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या गोंडस लेकीचं बारसं, नाव ठेवलंय खास...
अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठा राऊत (Sharmistha Raut) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकतेच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जन्म दिल्यानंतर आता अभिनेत्रीने आपल्या लेकीचं बारसं ठेवलं होतं. शर्मिष्ठाच्या लेकीच्या बारसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शर्मिष्ठाच्या लेकीच्या बारसाचे फोटो आणि व्हिडिओ ‘राजश्री मराठी’च्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आलेले आहेत. या बारश्याच्या कार्यक्रमात शर्मिष्ठाने आपल्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही. पण असं असलं तरीही शर्मिष्ठाने आता आपल्या लेकीचं नाव उघड केलं आहे.
“डोळ्यात पाणी आणून जागं करणारं अन्…”, सचिन खेडेकरांच्या ‘भूमिका’ नाटकाबद्दल हेमंत ढोमेची खास पोस्ट
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी शर्मिष्ठा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मालिकाविश्वासह सिनेसृष्टीतही तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शर्मिष्ठा राऊत हिने नुकतंच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने आपल्या लेकीचे नाव ‘रुंजी’ असं ठेवलं आहे. अभिनेत्रीच्या लेकीच्या बारश्या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ‘राजश्री मराठी’ने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहे. त्यांनी शेअर करताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. शर्मिष्ठाच्या लेकीच्या बारश्यामध्ये नाव अगदी हटक्या पद्धतीने सांगण्यात आले. इंग्रजी अल्फाबेटमधील प्रत्येक शब्द बाळाच्या आजीने, आजोबांनी, मावशीने, आत्याने आणि इतरत्र नातेवाईकांनी लावला.
शर्मिष्ठाने आपल्या लेकीचं नाव, ‘रुंजी’ (RUNJI) असं ठेवलं असून बारश्याच्या कार्यक्रमात पाच जणांकडे एक- एक शब्द होता. त्यांनी ते शब्द देत जोडत सर्वांना शब्द सांगितला. दरम्यान, अभिनेत्रीने आपल्या लेकीला जन्म केव्हा दिला, याची माहिती अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे. अभिनेत्री, निर्माती शर्मिष्ठा राऊतने लग्न कोरोना महामारीमध्ये केले. तेजस देसाईबरोबर शर्मिष्ठाने ऑक्टोबर २०२० मध्ये लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर आता शर्मिष्ठा आणि तेजसने लग्नाच्या साडे चार वर्षांनंतर आई-बाबा होत चाहत्यांसह आपल्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना सुखद धक्का दिला आहे. शर्मिष्ठा आणि तेजस आई- बाबा झाल्यानंतर खूपच आनंदीत आहेत. बारश्याच्या वेळी शर्मिष्ठा आणि तेजस या दोघांनीही मराठमोळा लूक करत सर्वांचेच लक्ष वेधलेय. शर्मिष्ठाने व्हाईट अँड रेड कलरची नऊवारी साडी तर तेजसने रेड कलरचा पैठणी स्टाईलचा कोट, व्हाईट कुर्ता आणि पायजमा वेअर केलेला होता. दोघांनीही एकमेकांना मॅचिंग लूक केलेला होता.
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने दिला गोंडस मुलीला जन्म, लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर दिली गोड बातमी
शर्मिष्ठा राऊतने आपल्या फिल्मी करियरमध्ये अभिनयासह निर्मितीची धुरा उत्कृष्टरित्या सांभाळली आहे आणि सांभाळत आहे. शर्मिष्ठाने साकारलेली ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेतील नीरिजा, ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील प्रेमळ पण लगेचच चिडणारी अर्चना, उंच माझा झोका’ मधली आलवणातली ताई काकू, ‘सारं काही तिच्यासाठी’ मधली संध्या ह्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेत. ‘बिग बॉस मराठी’मध्ये तिची वाइल्ड कार्डद्वारे एन्ट्री झाली होती आणि त्यानंतर जबरदस्त खेळानं तिनं प्रेक्षकांची मनं जिकलं. ‘फु बाई फू’ मधून तिनं आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम केलं. सध्या तिची निर्मिती असलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांना प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय शर्मिष्ठा चित्रपट निर्मितीही करताना दिसत आहे. या निर्मितीमध्ये तिच्याबरोबर तेजस जोडीला आहे.