एकता कपूरची काम करण्याची पद्धत, श्वेताने केला खुलासा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
एकता कपूरला ‘टीव्ही क्वीन’ म्हणणे चुकीचे ठरणार नाही. २००० च्या दशकात तिने तिच्या मालिकांद्वारे प्रत्येक घरात आपली ओळख निर्माण केली आहे. तिच्या मालिकांमध्ये काम करणारे स्टार कॅमेऱ्यावर प्रसिद्ध झाले असतील, पण याचे संपूर्ण श्रेय एकता कपूरला जाते जी कॅमेऱ्यामागे दिवसरात्र काम करते. अलीकडेच, श्वेता तिवारीनेही तिचे कौतुक केले आहे.
नागिन, कसौटी जिंदगी, कहानी घर घर की आणि क्यूंकी सास भी कभी बहू थी सारख्या सुपरहिट मालिका बनवणाऱ्या एकता कपूरबद्दल श्वेता तिवारीने खुलासा केला आहे की, एकेकाळी ती एका वेळी २२ शो हाताळत असे आणि रात्रंदिवस काम करत असे. एकेकाळी ती आणि एकता ७२ तास काम करत होते. हे ऐकून चाहत्यांना नक्कीच धक्का बसला आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
22 शो वर एकत्र काम
‘कसौटी जिंदगी के’ मध्ये प्रेरणाची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या श्वेता तिवारीने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्याशी झालेल्या संवादात एकता कपूरचे कौतुक केले. ती म्हणाली, “एकता कधीच झोपली नाही, ती एका वेळी २२ शो चालवत होती. लोक मला विचारायचे, तुला थकवा येत नाही का? आणि मी म्हणायचे, “एकताही काम करत आहे.” आपण तिच्याकडूनच प्रेरणा घेतली असल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले. एकता न थकता न झोपता सतत काम करायची असं श्वेताने सांगितले आहे.
‘क्योंकी सास भी कभी…’ चाहत्यांसाठी खास सरप्राईज, Cameo करणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री
श्वेता तिवारीला सीन्स समजावून सांगायची
एकता कपूर फक्त शो प्रोड्यूस करायची नाही तर क्रिएटिव्हिटीमध्येही गुंतलेली होती. ती स्टार्सना सीन्स समजावून सांगायची. अभिनेत्री म्हणाली, “जेव्हा जेव्हा मी एकताला फोन करायचे तेव्हा ती एकाच रिंगमध्ये फोन उचलायची. ती मला संपूर्ण सीन सविस्तरपणे समजावून सांगायची. ती ज्या पद्धतीने कथेचे स्पष्टीकरण द्यायची त्यामुळे माझे डोळे पाणावायचे.”
श्वेता एकता कपूरची कॉपी करायची
श्वेता तिवारी म्हणाली की ती एकता कपूरची कॉपी करायचे कारण तिची ओळी सांगण्याची पद्धत खूपच अद्भुत होती. अभिनेत्रीच्या मते, “ती जेव्हा जेव्हा संवाद बोलायची तेव्हा मला वाटायचे की ती माझ्यापेक्षा चांगली कामगिरी करत आहे. बऱ्याच वेळा मी एकता कपूरच्या संवाद बोलण्याच्या पद्धतीची कॉपी करण्याचा प्रयत्न करायचे. तिची आवड काहीतरी वेगळी होती.” असेही तिने यावेळी स्पष्ट केले.
श्वेता तिवारीने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला आणि नंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. या शो ने तिला घराघरात पोहचवले. याचे संपूर्ण श्रेय श्वेता तिवारी एकता कपूरला देते आणि आपल्या आयुष्यात तिचा खूपच मोठा वाटा असल्याचेही सांगते.
दिलजीत डोसांझचा आगामी चित्रपट ‘बॉर्डर २’ची शूटिंग अखेर पूर्ण! लवकरच होणार प्रदर्शित