फोटो सौजन्य - Social Media
पंजाबी संगीत सृष्टीत आपली छाप उमटवून बॉलिवूडच्या दिग्गज मंडळींना आपल्या गाण्यावर थिरवकणारा अभिनेता ‘दिलजीत डोसांझ’ त्याचा आगामी चित्रपट ‘बॉर्डर २’ साठी चर्चेत आहे. मुळात, या चित्रपटाची शूटिंग संपली असून त्याबद्दलची अपडेट स्वतः दिलीजित डोंसांझ यांनी दिली आहे. दिलजीतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
शेअर करण्यात आलेल्या क्षणांमध्ये अभिनेता दिलीजित डोसांझ शूटिंग संपण्याच्या आनंदात मिठाई वाटताना दिसून येत आहे. या क्षणांमध्ये स्वतः अभिनेता वरून धवनही दिसून येत आहे. दिलजीत स्वतःच्या हाताने वरुणाला मिठाई भरवताना दिसून येत आहे. तसेच दिलजीतने इतर स्टाफलाही मिठाई भरवत शूटिंग यशस्वीरीत्या पार पडण्याचा आनंद साजरा केला आहे.
ही पोस्ट दिलजीतने त्याच्या @diljitdosanjh या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केली आहे. तसेच पोस्टखाली ‘बॉर्डर २’ या आगामी चित्रपटाची शूटिंग संपली असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. पोस्टखाली सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांनी त्याला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अभिनंदन केले आहे.
दरम्यान, दिलजीतने ही बातमी देण्याअगोदर चित्रपटातील इतर काही कलाकारांनी या सिनेमाचे अपडेट्स दिले होते. अभिनेता अहान शेट्टी तसेच अभिनेता वरून धवनने याबाबत पोस्टदेखील शेअर केली होती. पुण्यात शूटिंग दरम्यानचे काही क्षण दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे चाहत्यांना शेअर केले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे ‘बॉर्डर २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंहने केले आहे. जुना चित्रपट ‘बॉर्डर’ या सिनेमाचा दुसरा भाग म्हणून ‘बॉर्डर २’ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भारत पाक युद्धांवर आधारित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करणार असल्याचे तर्क पेक्षकांकडून लावण्यात येत आहेत.