‘पुष्पा’फेम अल्लू अर्जुन बदलणार स्वत:चं नाव! नेमकं कारण काय ?
“पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर है मैं…” या डायलॉगने अवघ्या देशाचं लक्ष वेधलं… हा डायलॉग आहे, ‘पुष्पा’ चित्रपटातला… या चित्रपटात हा डायलॉग अभिनेता अल्लू अर्जुन बोलला आहे. या चित्रपटाच्या सक्सेसनंतर अल्लू अर्जुनच्या प्रसिद्धीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्या चित्रपटाने अल्लू अर्जुनला एक लोकप्रिय कलाकार बनवले आहे. या चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर अभिनेत्याने आता महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अल्लू अर्जुन स्वत:चं नाव बदलण्याचा विचार करत असल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. या लोकप्रिय कलाकाराने आपलं नाव बदलण्याचा का निर्णय घेतला असेल ? याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
‘बंजारा’ सिनेमाची रिलीज होण्याआधीच चर्चा, सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट…
अल्लू अर्जुन स्वत:चं नाव बदलण्याचा विचार करत असल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये अभिनेता त्याचं नाव बदलणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, त्यानं हा निर्णय का घेतला? अभिनेत्यानं स्वत:चं नाव बदलण्यामागचं नेमकं काय कारण असावं? आणि अल्लू अर्जुन आता त्याचं नवीन नाव काय ठेवणार? जाणून घेऊया… ‘कोईमोई’ आणि ‘सिने जोश’ने दिलेल्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुन स्वत:चं नाव बदलण्याच्या विचारात आहे. दरम्यान, ‘सिने जोश’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, अल्लू अर्जुन न्यूमेरोलॉजिकल (अंकशास्त्र) च्या सल्ल्यानुसार त्याच्या नावात दोन ‘U’ आणि दोन ‘N’ हे अल्फाबेट्स जोडण्याच्या तयारीत आहे.
क्रिकेटच्या मैदानावर रंगणार हास्याची इनिंग, ‘पत्रापत्री’मध्ये होणार IPL चा जल्लोष…
स्वत:च्या यशाला आणखी चालना देऊन, कारकीर्द आणखी बळकट करण्यासाठी अल्लू अर्जुनने नावात बदल करण्याचा निर्णय घेतला असावा, असं म्हटलं जात आहे. अर्थात, अल्लू अर्जुन स्वत:चं नाव बदलणार असल्याच्या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. नाव बदलण्याच्या चर्चांदरम्यानही अल्लू अर्जुन त्याच्या अपकमिंग चित्रपटामुळेही चर्चेत आहे. ‘पुष्पा-२’नंतर आता अल्लू अर्जुन आपल्या चाहत्यांसाठी एक नवा प्रोजेक्ट घेऊन येणार आहे. काही बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे अॅटली दिग्दर्शित ‘AA22’ नावाच्या या चित्रपटाची घोषणा अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी (८ एप्रिल) होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, अल्लू अर्जुन दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्यासोबतही एका चित्रपटावर काम करतोय. या चित्रपटात अल्लू अर्जुन भगवान कार्तिकेयची भूमिका साकारणार आहे. निर्माते नागा वंशी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, हा त्यांचा आगामी नवीन चित्रपट हा महाकाव्य शैलीचा आहे, जो रामायण आणि महाभारतापेक्षा खूप वेगळा असेल. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना या चित्रपटाचीही उत्सुकता लागून राहिली आहे. अल्लू अर्जुनचा या दोन मोठ्या चित्रपटांबरोबरच ‘पुष्पा ३’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल निर्माते रविशंकर यांनी माहिती दिली होती. ‘पुष्पा ३’ची घोषणा ‘पुष्पा २’ मध्येच करण्यात आली होती. अल्लू अर्जुनच्या सर्वच आगामी चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.