Malaika Arora recalls a female fan entered in her living room with scissor and she got scared
गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला होता. त्या हल्ल्यातून अभिनेता सावरला असून तो आता त्याची तब्येत व्यवस्थित आहे. सैफ अली खाननंतर आणखी एका सेलिब्रिटीवर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत घडला होता. अभिनेत्रीने हा धक्कादायक अनुभव एका मुलाखतीत सांगितला आहे. तिच्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
अलीकडेच, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने एका क्रेझी फॅनचा विचित्र अनुभव सांगितला. मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, “माझ्या लक्षात आहे की, मी माझ्या घरी तयारी करत होते. जेव्हा मी खाली लिव्हिंग रुममध्ये आली तर, तिथे समोर कोणीतरी बसलेलं होतं. समोर कोण बसलंय, कशासाठी ती व्यक्ती आलीय, याबद्दल मला काहीच माहिती नाही. माझ्या लिव्हिंग रुमच्या इथे ती महिला फक्त बसली होती. ती माझ्याशी बोलायला आली होती, पण मी तिला पाहून खूप घाबरले होते.”
‘नशा करो तो इन आँखो का, शराब मे क्या रखा है…’ समंथाच्या फक्त नजरेने तरुण घायाळ; नवा लुक पाहिलात का?
मलायका अरोराने पुढे सांगितले की, “सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे तिच्या बॅगेत कात्री होती. ती तिथे कात्री किंवा काहीतरी घेऊन बसली होती. मुख्य गोष्ट म्हणजे, ती दिसायला थोडी भीतीदायक ही दिसत होती. मला काहीतरी गडबड आहे असे वाटले, म्हणून मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. ही खरोखरच माझ्यासाठी सर्वात विलक्षण फॅन मीटिंग होती.”
दरम्यान, अभिनेत्रीसोबत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यासोबतच मलायकाला या दुर्घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. या परिस्थितीतून अभिनेत्री थोडक्यात बचावली. तथापि, या काळात ती खूप घाबरली होती. एखाद्या चाहत्याने आमंत्रण न देता एखाद्या स्टारच्या जवळ किंवा त्याच्या घरात जाण्याची ही पहिलीच घटना नाही. हे याआधीही अनेक स्टार्ससोबत घडले आहे, पण कात्री किंवा असे काहीतरी घेऊन जाणे म्हणजे ही बाब फार चिंताजनक आहे. पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या सेक्युरिटीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मलायका अरोरा सध्या रुपेरी पडद्यावर पाहायला मिळत नसली तरी ती अनेकदा तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती भले मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसत नसली, तरी ती टीव्ही शोची जज करते. आजकाल ती हिप हॉप इंडिया सीझन २ची परिक्षक आहे. याशिवाय तिने झलक दिखला जा, इंडियाज बेस्ट डान्सर आणि इंडियाज गॉट टॅलेंट शोदेखील जज केले आहे.