Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कारणामुळे Ameesha Patel चे झाले नाही लग्न, ‘अर्ध्या वयाची मुलं आता मला…’ व्यक्त केली खंत

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल ५० वर्षांची असूनही अविवाहित आहे. तिने अद्याप लग्न केलेले नाही. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्न न करण्याचे कारण सांगितले. शिवाय, तिने तिच्या गंभीर नात्याबद्दलही सांगितले.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 19, 2025 | 12:03 PM
अमिषा पटेलने नात्याबद्दल केला खुलासा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अमिषा पटेलने नात्याबद्दल केला खुलासा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • म्हणून अमिषा पटेल करत नाहीये लग्न 
  • ५० वर्षांची असूनही, अमिषाला अजूनही प्रस्ताव येत आहेत
  • अमिषा पटेलने केला ब्रेकअपबाबत खुलासा 

२००० मध्ये हृतिक रोशनसोबत “कहो ना प्यार है” या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करून अमिषा पटेल एका रात्रीत स्टार बनली. तिच्या निरागसतेने आणि सौंदर्याने लोकांना भुरळ घातली. २००० च्या दशकातील क्रश असूनही, ती अविवाहित आहे. ५० वर्षीय अभिनेत्रीने अद्याप लग्न केलेले नाही. अलिकडेच एका मुलाखतीत अमिषा पटेलने लग्न का टाळले आहे हे उघड केले. तिने सुरुवातीपासूनच लग्नाबद्दलचा तिचा दृष्टिकोन स्पष्ट केला.

अमिषाचे काही चित्रपट खूपच गाजले. मात्र ती बॉलीवूडमध्ये स्थिरावू शकली नाही. अनेक पार्टीमध्ये अथवा तिच्या खासगी आयुष्यामुळे मात्र ती कायम चर्चेत राहिली. अमिषाने आपल्या आयुष्याबाबत रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्ट शो मध्ये खुलासा केला आहे. 

Bigg Boss 19 : कुनिका सदानंदने पुन्हा साधला अभिषेक बजाजवर निशाणा, म्हणाली – “कोणतेही चांगले कुटुंब…”

म्हणूनच अमिषा पटेल स्थिरावली नाही

रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये, अमिषाने उघड केले की तिची पहिली प्राथमिकता नेहमीच तिचे करिअर राहिले आहे. तिला कोणाची पत्नी होण्यापूर्वी स्वतःला सेटल करायचे होते. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, “मी शाळेत कधीही मुलांचा पाठलाग केला नाही. तेच असे करायचे. त्यानंतर, मला खूप प्रस्ताव आले आणि अजूनही लग्नासाठी येत आहेत, पण ज्या मुलांना मी भेटले त्यांना लग्नानंतर मी घरी राहावे असे वाटत होते आणि मी काम करू नये असंही त्यांना वाटत होते आणि मला ते आवडले नाही. मला सुरुवातीला ‘अमिषा पटेल’ व्हायचे होते कारण मी माझ्या आयुष्याचा बराचसा भाग कोणाची तरी मुलगी म्हणून घालवला होता आणि मला माझे प्रौढ आयुष्य फक्त कोणाची तरी पत्नी म्हणून घालवायचे नव्हते.”

यामुळेच पूर्वीचे नाते संपले

गदर अभिनेत्रीने खुलासा केला की चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिचे एक गंभीर नाते होते, परंतु ते एका कारणामुळे संपले. ती म्हणाली, “जे लोक तुम्हाला प्रेम करतात ते तुमचे करिअर यशस्वी होऊ देतील. मी माझ्या करिअरसाठी आणि प्रेमासाठी खूप काही गमावले आहे. मी माझ्या करिअरसाठी दुसऱ्या गोष्टीचा त्याग केला आणि मला वाटते की मी दोन्ही गोष्टींमधून केवळ शिकलेच आहे.”

अभिनेत्रीने पुढे स्पष्ट केले की, “तो माझ्यासारखाच दक्षिण मुंबईतील एका प्रतिष्ठित औद्योगिक कुटुंबातून आला होता. आमची पार्श्वभूमी आणि शिक्षण समान होते आणि कुटुंबातील वातावरणही सारखेच होते. सर्व काही ठीक होते, पण जेव्हा मी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या जोडीदाराला लोकांच्या नजरेत राहणे आवडत नव्हते आणि म्हणून मी प्रेमापेक्षा करिअरला प्राधान्य दिले आणि त्या नात्यातून बाहेर पडले”

सारंगची अटक आणि सावलीची झुंज! ‘सावळ्याची जणू सावली’ एका नव्या वळणावर

तरूण मुलांचा प्रस्ताव 

अमिषा पटेल म्हणते की आज तिच्या अर्ध्या वयाचे पुरुष तिला लग्नासाठी प्रस्ताव देतात आणि तिला डेटवर येण्याची विनंती करतात. ती वयाने लहान असणाऱ्या पुरुषाशी लग्न करण्यासही तयार आहे. ती म्हणते, “जर मला योग्य व्यक्ती सापडली तर मी लग्नासाठी तयार आहे. म्हणतात ना ‘जिथे इच्छा असते, तिथे मार्ग असतो’, म्हणून असा व्यक्ती मला ज्यावेळी सापडेल, तेव्हा ती संधी मी सोडणार नाही; तो माझा जीवनसाथी असेल. मला अजूनही अनेक श्रीमंत कुटुंबांकडून लग्नाचे प्रस्ताव येतात. माझ्या अर्ध्या वयाचे पुरुषही मला डेट करू इच्छितात आणि मी त्यासाठी तयारही आहे. पण पुरूष मानसिकदृष्ट्या प्रौढ असावा हीच माझी अपेक्षा आहे. मी माझ्यापेक्षा मोठ्या अनेक पुरुषांना भेटले आहे, परंतु त्यांचे मेंदू माशीइतकाही मोठा नाहीये.” अमिषा सध्या वेगवेगळ्या गोष्टी करत असून नुकताच आलेला गदर २ देखील प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला.

अमिषाचा व्हिडिओ

 

Web Title: Ameesha patel was in serious relationship ends it revealed reason still receives marriage proposals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • bollywod news
  • entertainment
  • Entertainment News

संबंधित बातम्या

पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय
1

पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी
2

फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी

उद्योगपती वेदांत बिर्ला अडकला लग्नबंधनात, दीर्घकालीन मैत्रीण तेजल कुलकर्णीशी केले लग्न
3

उद्योगपती वेदांत बिर्ला अडकला लग्नबंधनात, दीर्घकालीन मैत्रीण तेजल कुलकर्णीशी केले लग्न

सोनाक्षीला लग्नानंतर सासू- सासऱ्यांसोबत राहण्याची नव्हती इच्छा? पती झहीरला आधीच केले स्पष्ट
4

सोनाक्षीला लग्नानंतर सासू- सासऱ्यांसोबत राहण्याची नव्हती इच्छा? पती झहीरला आधीच केले स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.