बॉलिवूडचे शहेनशाहही आहेत 'या' टॉलिवूड अभिनेत्याचे सर्वात मोठे फॅन, 'पुष्पा २'बद्दल महत्वपूर्ण भाष्य
‘कौन बनेगा करोडपती’चं सध्या १६वं पर्व सुरू आहे. या कार्यक्रमात आलेल्या स्पर्धकांसोबत बिग बी बच्चन नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी मोकळेपणाने सांगत असतात. अलीकडेच त्यांच्या समोर हॉटसीटवर ‘इंडिया चॅलेंजर वीक’ची स्पर्धेत कोलकात्याची रजनी बनरवाल बसली होती; जी मध्यमवर्गीय कुटुंबात आली आहे. यावेळी तिने अमिताभ बच्चन यांना काही हटके प्रश्न विचारले होते.
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची जगभरात क्रेझ आहे. हा चित्रपट सध्या एकापाठोपाठ एक अनेक विक्रम करताना दिसत आहे. बी-टाऊनमध्येही अल्लू अर्जुन आणि ‘पुष्पा २’चे खूप कौतुक होत आहे आणि चाहतेही चित्रपटासाठी कमालीचे वेडे झाले आहेत. अशातच अमिताभ बच्चन यांनीही चित्रपटाचे आणि अल्लू अर्जुनचे कौतुक केले आहे.
सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात; व्हिडिओतून दाखवली पहिली झलक
एपिसोड दरम्यान बिग बींनी ते स्वत: अल्लू अर्जुनचे मोठे फॅन असल्याचे सांगितले. बिग बी आणि अल्लू अर्जुन यांच्यातील काही साम्यही त्यांनी निदर्शनास आणून दिले. एपिसोडमध्ये, अमिताभ बच्चन रजनी यांना म्हणाले, “कम्प्युटरने मला सांगितले की तू अल्लू अर्जुनची खूप मोठी फॅन आहेस.” यावर रजनीने उत्तर दिले की, “सर, मी अल्लू अर्जुन आणि तुमचीही फार मोठी फॅन आहे.” यावर बिग बींनी हसून उत्तर दिले की, “आता माझे नाव जोडल्याने काही फरक पडणार नाही.” अमिताभ पुढे म्हणाले, “अल्लू अर्जुन हा एक अतिशय प्रतिभावान कलाकार आहे आणि त्याला मिळालेल्या ओळखीचा तो पात्र आहे. मीही त्याचा मोठा चाहता आहे. नुकताच त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तुम्ही तो अजून पाहिला नसेल तर तो जरूर पहा. पण माझी तुलना त्याच्यासोबत करू नकोस.”
“अलविदा सरदार !” अभिनेता किरण मानेंची डॉ. मनमोहन सिंहसाठी खास भावनिक पोस्ट चर्चेत
बिग बींनी हे सांगितल्यानंतर पुढे रजनी बनरवालने सांगितलं की, “तुम्हा दोघांमध्ये खूप साम्य आहे. तुम्हा दोघांची एन्ट्री अप्रतिम आहे. जेव्हा तुम्ही दोघे कॉमेडी सीन करता तेव्हा तुम्ही तुमची कॉलर चावता आणि डोळे मिचकावता.” यावर अमिताभ बच्चन यांनी कोणत्या चित्रपटात हा सीन आहे, असं विचारलं. त्यानंतर रजनीने बिग बींच्या ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटाचे नाव घेतले. रजनीने पुढे सांगितले की, “तुला भेटण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि आता मला अल्लू अर्जुनला भेटायचे आहे.” याआधी अल्लू अर्जुनने बिग बींची स्तुती करताना बरेच काही सांगितले होते. अल्लू अर्जुनने सांगितले होते की, अमिताभ यांना पाहून मला खूप प्रेरणा मिळते. अल्लू अर्जुनने असेही सांगितले की तो बिग बींचा मोठा चाहता आहे आणि त्याचे चित्रपट पाहत मोठा झाला आहे.