सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात; व्हिडिओतून दाखवली पहिली झलक
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सूरज चव्हाणचं नाव घराघरांत लोकप्रिय झालं. ‘झापुक झुपूक’ अंदाजात या ‘गुलीगत किंग’ने ‘बिग बॉस’ च्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ‘बिग बॉस’च्या घरात असताना सूरज ७० दिवस कमालीचा चर्चेत राहिला होता. बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर सूरजने त्याच्या गावात स्वत:चं घर बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. या घराला ‘बिग बॉस’ असं नाव देणार असल्याचंही तो म्हणाला होता.
“अलविदा सरदार !” अभिनेता किरण मानेंची डॉ. मनमोहन सिंहसाठी खान भावनिक पोस्ट चर्चेत
काही तासांपूर्वीच सूरजने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सूरजच्या घराचं बांधकाम जोरदार पद्धतीने सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सूरजच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सूरज स्वत: त्याचं हे नवीन घर बांधताना दिसत आहे. शिवाय, तो स्वत: त्याच्या घराच्या बांधकामाला पाणी देताना दिसत आहे. “माझं घर… लवकरच ‘बिग बॉस’चा बंगला”, असं कॅप्शन सूरजने या व्हिडिओला दिलं आहे. पण आता लवकरच, सूरजच्या स्वत:च्या घराची इच्छा पूर्ण होणार, हे नक्की…
बिग बॉसच्या घरामध्ये येण्यापूर्वी सूरज चव्हाणच्या घरची आणि त्याच्या कुटुंबीयांची परिस्थिती फारच हालाखीची होती. सूरज लहान असतानाच त्याच्यावरील आई-वडिलांचं छत्र हरपलं. आई- वडिलांच्या निधनानंतर सूरजचा सांभाळ त्याच्या बहिणींनी केला. कोरोनाकाळात टिक टॉक आणि त्यानंतर इन्स्टाग्राम रिल्समुळे सूरज घराघरांत फेमस झाला. खरंतर, ‘बिग बॉस’मुळेच सूरजच्या करियरला कलाटणी मिळाली आहे. ग्रँड फिनालेच्या वेळी सूरजने गावी जाऊन सर्वात आधी आपलं हक्काचं घर बांधणार आणि त्याला ‘बिग बॉस’चं नाव देणार असा निश्चय केला होता.
All We Imagine As Light : ‘ऑल व्ही इमॅजिन ॲज लाइट’ ओटीटीवर सज्ज, पायल कपाडियाने व्यक्त केला आनंद!
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची ट्रॉफी आपल्या नावावर कमावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला लवकरात लवकर हक्काचं घर बांधून देण्यात येईल असा शब्द दिला होता. आता त्याच घराचं बांधकाम सुरू झालेलं आहे. अजित पवारांनी घोषणा केल्यानंतरच लगेचच सूरजच्या नव्या घराचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सूरजने सांगितले की, “घराचं स्वप्न पूर्ण होतंय याचा प्रचंड आनंद झालाय. मला खूप बरं वाटतंय. दादांनी (अजित पवार यांनी) माझं हे घराचं स्वप्न पूर्ण केलं. गरीबाच्या पोराला मदत केली यासाठी त्यांचा मी खूप आभारी आहे.” आता सूरजने याची खास झलक आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
सूरजने शेअर केलेल्या ह्या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आलेला आहे. लवकरच जिओ सिनेमाच्या बॅनरखाली केदार शिंदेच्या दिग्दर्शनात सूरजच्या आयुष्यावर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट येणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदेंनी ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेवेळी त्याच्यावर चित्रपट काढणार असल्याची घोषणा केली होती. ‘झापुक झुपूक’ असं त्याच्या चित्रपटाचं नाव असणार आहे.