(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत सतत नवनवीन प्रयोग होत आहेत. दमदार कथा, हटके विषय आणि फ्रेश जोड्या यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायमच वाढत असते. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एका खास चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना एक आगळीवेगळी ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असून या चित्रपटात पहिल्यांदाच हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या ताज्या केमिस्ट्रीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटातून सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी प्रेक्षकांसमोर घेऊन येणारे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यावेळी या नव्या जोडीला घेऊन येत आहेत.
दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले, “लवकरच प्रेक्षकांसाठी एक मनोरंजक चित्रपट घेऊन येत आहोत. या चित्रपटाची कथा लवकरच समोर येईल, इतकं नक्की की, हृता आणि सारंग यांच्या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रेम देतील, याची मला खात्री आहे.”
‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर
हेमा मालिनींनी सेल्फीला दिला नकार! सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया
‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन, संगीत, आणि बाकीच्या कलाकारांची नावे लवकरच अधिकृतपणे जाहीर होणार आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अशी नव्या चित्रपटाची घोषणा होणं ही प्रेक्षकांसाठी एक खास सांस्कृतिक भेटच ठरत आहे.
फाईन ब्रू प्रोडक्शन्स प्रस्तुत आणि ट्रू होप फिल्म वर्क्स यांच्या सहयोगाने हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन आनंद गोखले यांचे आहे. तर ईशा मूठे, श्रुती साठे आणि जयकुमार मुनोत हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.दरम्यान ऋताबद्दल सांगायचे झाल्यास, अलिकडेच ती ‘आरपार’ सिनेमामुळे चर्चेत आली होती. ललित प्रभाकर आणि ऋता यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीचे विशेष कौतुक झाले.