(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूडची “ड्रीम गर्ल” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी या सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगमुळे चर्चेत आहेत. एका कार्यक्रमात झालेल्या प्रसंगाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे, ज्यामुळे त्या परत चर्चेचा विषय बनल्या आहेत. त्या एका नवरात्रीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होत्या.एका चाहत्याने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कृतीने त्या चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी पर्पल रंगाच्या साडीत आणि भव्य दागिन्यांनी खूप सुंदर दिसत होत्या. मात्र, एका कार्यक्रमात घडलेला प्रसंग त्यांच्या या लूकच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय बनला आहे.
उत्तर प्रदेशातील नवरात्री कार्यक्रमातील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ही महिला संपूर्ण कार्यक्रमात हेमा मालिनी यांच्या मागे जाताना दिसते. हा व्हिडिओ पाहून लोकांना असे वाटते की हेमा मालिनी यांनी त्यांच्या अहंकारामुळे चाहत्याकडे दुर्लक्ष केले. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका वापरकर्त्याने व्हिडिओवर कमेंट केली, “हेमा मालिनी, एक अहंकारी महिला.” दुसऱ्याने लिहिले, “काही नायिका जास्त अहंकारी असतात. फक्त रेखालाच सर्वांना प्रेम कसे करावे हे माहित आहे.” दुसऱ्याने म्हटले, “हेमाचा दृष्टिकोन जया बच्चनसारखाच आहे.” काही जणांनी त्यांना अहंकारी म्हटले. तर काही चाहत्यांनी त्यांना पाठिंबा देत कमेंट्स केल्या आहेत.
Bigg Boss 19 : “घराबाहेर काढूनच दाखव!” , कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रणीत-बसीरमध्ये खडाजंगी
Tu He Re Maza Mitwa : ईश्वरीसमोर येणार राकेशचं सत्य; ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण
हेमा मालिनी यांना चाहत्यांकडून पाठिंबा
आता, बहुतेक लोक या व्हिडिओनंतर हेमा मालिनी यांना ट्रोल करताना दिसतात. त्याच वेळी, काही चाहते अभिनेत्रीच्या समर्थनात बोलत आहेत. चाहते म्हणतात की फोटो काढण्यापूर्वी सेलिब्रिटींची परवानगी घेतली पाहिजे. सेलिब्रिटी देखील माणूस आहेत आणि ते अस्वस्थ असू शकतात. तथापि, या व्हिडिओवरून असे दिसून येते की हेमा मालिनी अचानक कॅमेरा पाहून घाबरल्या आणि त्यांचा हेतू चाहत्याकडे दुर्लक्ष करण्याचा नव्हता.