बॉलिवूडच्या गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांचे सुपूत्र आनंद भोसले (Anand Bhosale) यांना दुबईतील रुग्णालयातील दाखल (Asha Bhosale Son Hospitalized) करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी आनंद अचानक जमिनीवर पडले आणि त्यानंतर त्यांना काही जखमा झाल्या होत्या. आनंद हे बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले होते.
[read_also content=”राष्ट्रीय बाल आरोग्य योजना ठरली संजीवनी, जिल्ह्यातील ६५ हृदयरुग्ण बालकांची मोफत शस्त्रक्रिया https://www.navarashtra.com/maharashtra/national-child-health-scheme-sanjeevani-free-surgery-for-65-heart-patients-in-the-district-nraa-269411.html”]
आनंद यांची प्रकृती सध्या चिंताजनक नसल्याने त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा आशा भोसले याही दुबईत होत्या आणि त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व अचानक घडले. मंगेशकर आणि भोसले यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंद यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आजही जवळपास दररोज दुबईला फोन करत आहे.
आशा यांना एकूण तीन मुलं होती. परंतु, त्यांचा मोठा मुलगा हेमंत भोसले आणि मुलगी वर्षा भोसले आज या जगात नाहीत. २०१५ साली हेमंत भोसले यांचं कर्करोगाने निधन झालं. तर आशा यांच्या मुलीने डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. आनंद आशा यांचा तिसरा मुलगा आहे.