सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. यावर्षी सुद्धा ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भातपिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे कापणी योग्य भात पीक भिजून गेल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला. यानंतर प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त १८ हजार ३७१ शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ८ लाख ६९ हजार रुपये भरपाई मंजूर झाली आहे.