पीएमआरडीएकडून भूखंडांचा ई-लिलाव जाहीर (फोटो- सोशल मीडिया)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) हद्दीतील भूखंडांमध्ये तीन शैक्षणिक वापराचे भूखंड, नऊ वाणिज्य व सार्वजनिक सुविधा भूखंड, एक वैद्यकीय वापराचा भूखंड, एक सार्वजनिक सुविधा (लायब्ररी/संगीत शाळा) भूखंड आणि एक फॅसिलिटी सेंटर भूखंड यांचा समावेश आहे. याशिवाय, पुणे ग्रामीण हद्दीतील १४ सुविधा भूखंड (Amenity Space) तसेच भांबुर्डा (शिवाजीनगर) येथील एक वाणिज्य भूखंडदेखील या ई-लिलावाचा भाग आहेत.
या भूखंडांचे वाटप पात्र आणि इच्छुक व्यक्ती अथवा संस्थांना ई-लिलावाद्वारे केले जाणार आहे. या ई-लिलाव प्रक्रियेच्या अटी व शर्तींची सविस्तर माहिती https://eauction.gov.in आणि पीएमआरडीएचे अधिकृत संकेतस्थळ www.pmrda.gov.in वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पुणे महानगराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Devendra Fadnavis: पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामे; 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर
प्रमुख तारखा आणि प्रक्रिया
1.नोंदणी व कागदपत्रे डाऊनलोड करण्याची मुदत: दि. १५ डिसेंबर २०२५, सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. १३ जानेवारी २०२६, सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत इच्छुक व्यक्ती आणि संस्थांना https://eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
2.तांत्रिक बोलीदारांची घोषणा: तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या बोलीदारांची घोषणा दि. २२ जानेवारी २०२६ रोजी केली जाईल.
3.लाईव्ह ई-लिलाव (Live Auction): अंतिम ई-लिलाव प्रक्रिया दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सुरू होईल.
CM देवेंद्र फडणवीसांनी दिली मान्यता
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनिसा:रण योजनांच्या 27 गावांमधील 1209.8 कोटींच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामांमुळे संबंधित गावातील 39 लाख 42 हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे.
“PMRDA मधील 1209.08 कोटींच्या कामांना…”; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली मान्यता
प्राधिकरणाने अग्निशमन सेवा शुल्कापोटी जमा झालेल्या निधीच्या विनियोगासाठी पुणे शहराचा ‘अग्नी प्रतिबंधक उपाययोजना आराखडा ‘ तयार करावा, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 13 वी सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.






