घणसोली येथील सेक्टर-७ मधील सिम्प्लेक्सच्या पुनर्विकासाचा प्रश्न सध्या चांगलाच तापला आहे. इमारतींचा पुनर्विकास रखडल्यामुळे अनेक कुटुंबे धोकादायक अवस्थेत असलेल्या जुन्या इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहण्यास मजबूर आहेत. पुनर्विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या, विविध यंत्रणांचे अहवाल तसेच नियमांनुसारची प्रक्रिया सोसायटी धारकांना पूर्ण झालेली असतानाही, महापालिका आयुक्तांकडून अद्याप अंतिम परवानगी दिली जात नसल्याचा आरोप सिम्प्लेक्सच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ही परवानगी राजकीय दबावाखाली अडवली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.