Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशा भोसले यांनी शेअर केल्या बाबुजींसोबतच्या आठवणी ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाला दिल्या शुभेच्छा!

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 08, 2024 | 02:35 PM
आशा भोसले यांनी शेअर केल्या बाबुजींसोबतच्या आठवणी ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाला दिल्या शुभेच्छा!
Follow Us
Close
Follow Us:

मराठी मनावर कोरलेले संगीतविश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके. म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबुजी. आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाबुजींची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ (Swargandharva Sudhir Phadke) चित्रपट येत्या १ मे रोजी रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटगृहात नव्याने अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. दरम्यान ‘स्वरांची गंगा’ समजल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी बाबुजींसोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.

[read_also content=”‘जर तर ची गोष्ट’ची’ची शंभरी प्रिया बापटच्या आवाजातील गाणे प्रदर्शित! https://www.navarashtra.com/movies/priya-bapat-umesh-kamat-starrer-jar-tar-chi-gosht-play-marathi-song-released-nrps-521705.html”]

बाबुजी आणि आशाबाईंनी कायमच आपल्या प्रतिभेची चमक दाखवली आहे. त्यांच्या स्वर्गीय सुरांनी नटलेल्या प्रत्येक गाण्याला लाभलेली लोकप्रियता अवर्णनीय आहे. या दोघांनी गायलेली सगळीच गाणी ऐकताना त्या कलाकृतीच्या अलौकिकतेचा प्रत्यय येतो. ही गाणी सदाबहार असून ‘जगाच्या पाठीवर’, ‘या सुखांनो या’, ‘धाकटी बहीण’, ‘लाखाची गोष्ट’, ‘सुवासिनी’, ‘लक्ष्मीची पाऊले’ अशा अनेक चित्रपटांतील गाण्यांना या जोडीचा आवाज लाभला आहे. ही सगळीच गाणी अजरामर आहेत.

आशा भोसले बाबुजींसोबतच्या आठवणींना उजाळा देताना म्हणतात, ” बाबुजी म्हणजे एक अष्टपैलू आणि कलासक्त कलाकार. ‘का रे दुरावा…’ चा एक गंमतीदार किस्सा म्हणजे. हे गाणे गाताना ‘का रे दुरावा… ही ओळ गाताना बाबुजींनी मला खूपच हावभाव व्यक्त करण्यास सांगितले. परंतु हे करताना मला खूप हसायला येत होते. मी असे हावभाव दिले तर लोकं वेडं म्हणतील मला. त्यावर त्यांचे उत्तर होते, नाही.. नाही… चांगलं म्हणतील. अशा पद्धतीने ते गाणं शिकवायचे. त्यामुळे आम्ही समृद्ध होत गेलो. मी बाबुजींना खूप मानते, ते माझे गुरूच आहेत. त्यांची आयुष्यगाथा सांगणारा चित्रपट येतोय. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद.”

सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Asha bhosle shares her memories with babuji wishes the movie swargandharva sudhir phadke nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2024 | 02:35 PM

Topics:  

  • asha bhosle
  • entertainment

संबंधित बातम्या

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
1

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…
2

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
3

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ
4

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.