Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आनंदी’मध्ये मोठा ट्विस्ट! सई रानडेची मालिकेमध्ये दमदार एन्ट्री; युगंधरशी रंगणार जबरदस्त संघर्ष

स्टार प्रवाहच्या ‘आनंदी’ मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सई रानडेची एन्ट्री होताना दिसणार आहे. अशातच अभिनेत्री शलाका हे पात्र साकारणार असून, तिला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 01, 2026 | 01:18 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘आनंदी’मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट
  • सई रानडेची दमदार एन्ट्री
  • युगंधरशी रंगणार जबरदस्त संघर्ष
 

आनंदी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली असून, आता या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर कथेला नवं वळण देणारी शलाका ही व्यक्तिरेखा लवकरच एन्ट्री घेणार आहे. ही महत्त्वपूर्ण भूमिका सई रानडे साकारणार असून, तिच्या आगमनामुळे मालिकेतील नाट्य अधिक रंगतदार होण्याची शक्यता दिसत आहे.

‘मला कौतुक वाटते…’ संसदेत राघव चड्ढांची पितृत्व रजेची मागणी; पत्नी परिणीती चोप्राने व्यक्त केला अभिमान

शलाका ही प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची मेहुणी आहे. युगंधरची दिवंगत पत्नी समिधा आणि शलाका या जुळ्या बहिणी असल्या तरी त्यांच्या स्वभावात जमीन-आस्मानाचा फरक आहे. समिधा जिथे शांत, समंजस आणि प्रेमळ स्वभावाची होती, तिथे शलाका मात्र उथळ, अहंकारी आणि स्वतःच्या सौंदर्य आणि संपत्तीचा गर्व बाळगणारी आहे. युगंधरने शलाकाऐवजी समिधाची जीवनसाथी म्हणून निवड केली, ही गोष्ट शलाकाच्या मनात खोलवर घर करून आहे.

यामुळे शलाकाने युगंधरचा नाश करण्याचा निर्धार केला आहे. आपल्या पैशाच्या बळावर तिने गारमेंट व्यवसायात स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे आणि युगंधरला हरवणं हाच तिच्या आयुष्याचा एकमेव उद्देश बनला आहे. विशेष म्हणजे, जोपर्यंत ती आपलं ध्येय साध्य करत नाही, तोपर्यंत रंगीत कपडे न घालण्याचा निर्धार करत ती केवळ काळ्या रंगाचे कपडे परिधान करते. ज्यामुळे तिच्या व्यक्तिरेखेला आणखी गूढ आणि प्रभावी रंग मिळतो.

गोमतीच्या आयुष्यात नवी सुरुवात; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींच्या कृपेने पुनर्विवाहाचे संकेत

शलाकाच्या एन्ट्रीनंतर मालिकेतील नातेसंबंध, संघर्ष आणि भावनिक नाट्य अधिक तीव्र होणार आहे. युगंधर आणि शलाका यांच्यातील संघर्ष कसा उलगडतो, कोण कुणावर भारी पडतो, आणि या सगळ्यात ‘आनंदी’च्या आयुष्यावर काय परिणाम होतो. हे पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. या सगळ्या थरारक घडामोडी पाहण्यासाठी ‘आनंदी’ मालिका प्रेक्षकांना रात्री ९:३० वाजता स्टार प्रवाहवर पाहावी लागेल.

Web Title: Anandi serial shalaka entry sai ranade twist yugandhar conflict star pravah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi serial news
  • star pravah

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
2

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.