Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोमतीच्या आयुष्यात नवी सुरुवात; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींच्या कृपेने पुनर्विवाहाचे संकेत

गोमतीच्या आयुष्यात नवी सुरुवात होणार आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींच्या कृपेने पुनर्विवाहाचे संकेत गोमतीच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि परिवर्तनकारी टप्पा उलगडताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 01, 2026 | 12:55 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • गोमतीच्या आयुष्यात नवी सुरुवात
  • स्वामींच्या कृपेने नव्या सुरुवातीची चाहूल
  • शिवसोबत नातं जुळण्याचे संकेत
 

जय जय स्वामी समर्थ या मालिकेत सध्या गोमतीच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि परिवर्तनकारी टप्पा उलगडताना दिसत आहे. स्वामींच्या कृपेने आणि त्यांच्या सूचक लीलांमधून गोमतीच्या आयुष्यात नव्या अध्यायाची चाहूल लागते. विधवा म्हणून आयुष्य संपल्याची भावना मनात बाळगणाऱ्या गोमतीला स्वामी विविध संकेत देत नव्याने जगण्याची प्रेरणा देतात. कधी रोपट्याला पाणी घालताना, तर कधी महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करताना प्रत्येक कृतीतून स्वामी तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आणि सौभाग्य येणार असल्याचे संकेत देतात. हळूहळू तिचं शिव नावाच्या तरुणाशी नातं जुळणार असल्याचं स्पष्ट होत जातं आणि तिच्या आयुष्यात नव्या सुरुवातीची किरणं दिसू लागतात.

Ranjith: मल्याळम दिग्दर्शकला अटक; लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाप्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात

दुसरीकडे, गोमतीवर निखळ प्रेम करणारा शिव गावातील जुनाट आणि कठोर विचारसरणीसमोर उभा ठाकतो. स्वामी त्याला “संघर्षाशिवाय सिद्धी नाही” हा मोलाचा संदेश देतात. हा संघर्ष केवळ वैयक्तिक प्रेमासाठी नसून, एका स्त्रीला नव्याने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी आहे. गोमतीचे सासरे सुभेदार यांच्या तीव्र विरोधाला न जुमानता शिव ठामपणे तिच्या पाठीशी उभा राहतो. सुभेदारांनी रचलेले अनेक डाव स्वामींच्या हस्तक्षेपामुळे फोल ठरतात आणि योग्य वेळी गोमतीचे रक्षण होते. मात्र, समाजाचा विरोध आणि परंपरांच्या नावाखाली उभं राहिलेलं मोठं संकट या नात्याला सतत आव्हान देत राहतं.

‘मला कौतुक वाटते…’ संसदेत राघव चड्ढांची पितृत्व रजेची मागणी; पत्नी परिणीती चोप्राने व्यक्त केला अभिमान

या सगळ्या घडामोडींमध्ये स्वामी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतात. विधवेला पुन्हा जगण्याचा, आनंदी होण्याचा आणि पुनर्विवाहाचा अधिकार नाही का? या प्रश्नातून समाजातील कठोर वास्तव आणि बदलाची गरज अधोरेखित होते. अखेर, प्रचंड विरोध असूनही स्वामींच्या कृपेने आणि निसर्गाच्या संकेताने गोमतीच्या आयुष्यात पुनर्विवाहाचा शुभ क्षण येणार असल्याची चाहूल लागते. विशेष म्हणजे, या प्रसंगात निसर्ग स्वतःच तिच्या आयुष्यात हळद-कुंकवाचं सौभाग्य घेऊन येतो हा एक दिव्य आणि भावनिक चमत्कार ठरणार आहे.

आता प्रश्न असा हा बदल खरंच घडणार का? आणि समाजातील विरोधक त्याला थांबवू शकतील का? मालिकेमध्ये घडणाऱ्या घडामोडी पाहण्यासाठी ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Jai jai swami samarth gomati remarriage twist swami blessings marathi serial update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
1

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
2

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

अरे देवा! चक्क ५ वीच्या पुस्तकात छापलं ऐश्वर्या रायचं ‘निंबुडा-निंबुडा’ गाणं; शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची जोरदार चर्चा
3

अरे देवा! चक्क ५ वीच्या पुस्तकात छापलं ऐश्वर्या रायचं ‘निंबुडा-निंबुडा’ गाणं; शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची जोरदार चर्चा

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
4

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.