Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रदर्शनापूर्वीच श्रुती मराठेच्या ‘गुलाबी’चित्रपटाने केली कोट्यवधींची कमाई…

मराठी चित्रपटसृष्टीत ‘गुलाबी’ चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे. २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शानपूर्वीच कोट्यवधींचा गल्ला जमावला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 18, 2024 | 05:46 PM
प्रदर्शनापूर्वीच श्रुती मराठेच्या ‘गुलाबी’चित्रपटाने केली कोट्यवधींची कमाई...

प्रदर्शनापूर्वीच श्रुती मराठेच्या ‘गुलाबी’चित्रपटाने केली कोट्यवधींची कमाई...

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत ‘गुलाबी’ चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे. २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शानपूर्वीच एक कोटींचा गल्ला जमवला आहे. असा विक्रम साधणारा ‘गुलाबी’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. बुकिंग सुरू होताच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी तिकिटे आरक्षित केली आहेत. या चित्रपटाचे प्री-बुकिंग अवघ्या एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

हे देखील वाचा- ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ फेम रणवीर ब्रारचा अपघात, अभिनेताला पाठीच्या कण्याला झाली गंभीर दुखापत!

गुलाबी नगरी, जयपूरच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या तीन स्त्रियांच्या मैत्रीचा हा प्रवास प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा ठरणार आहे. तीन मैत्रिणींच्या मैत्रीचा प्रवास आणि त्यांच्या स्वप्नांची सफर आपल्याला चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. एकत्र आलेल्या या तीन मैत्रिणी कशा आपल्या आयुष्यातील संघर्षांना सामोरे जातात आणि मैत्रीतून जगण्याची एक वेगळी दिशा शोधतात, याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.

 

दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “पूर्वप्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांचा हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूप मोठा आहे. प्रेक्षकांचा हा पाठिंबा ‘गुलाबी’ चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही या प्रवासाचा आनंद घेत आहोत. ‘गुलाबी’ चित्रपटात मैत्री आणि स्वप्नांचा एक सुंदर प्रवास दाखवला आहे. लोकांच्या हृदयात ‘गुलाबी’ने आधीच स्थान मिळवले आहे याचा खूप आनंद होतो. प्रेक्षकांना चित्रपट नक्की आवडेल याची खात्री आहे.’’

हे देखील वाचा- ‘द साबरमती रिपोर्ट’ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई, पहिल्या विकेंडला कसा मिळाला प्रतिसाद ?

व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत, अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित ‘गुलाबी’ या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे निर्माते आहेत. यात चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, शैलेश दातार, आणि निखिल आर्या यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर अमोल भगत या चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत.

Web Title: Ashwini bhave mrinal kulkarni shruti marathe starrer gulaabi marathi movie it has earned rs 1 crore even before the release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 05:41 PM

Topics:  

  • Ashwini Bhave
  • entertainment
  • marathi film
  • mrinal kulkarni
  • Shruti Marathe

संबंधित बातम्या

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा
1

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा

Bigg Boss 19 : Mridul Tiwari ला बाहेर केल्यानंतर सोशल मिडीयावर चाहते संतापले! म्हणाले – हा एक स्क्रिप्टेड
2

Bigg Boss 19 : Mridul Tiwari ला बाहेर केल्यानंतर सोशल मिडीयावर चाहते संतापले! म्हणाले – हा एक स्क्रिप्टेड

अभिनेत्री गिरिजा ओक तरुणाईची बनतेय “नॅशनल क्रश”, प्रसिद्धीच्या झोतात अभिनेत्री
3

अभिनेत्री गिरिजा ओक तरुणाईची बनतेय “नॅशनल क्रश”, प्रसिद्धीच्या झोतात अभिनेत्री

‘होय मी जय भीमवाली…’ ’या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे बेधडक विधान, सोशल मीडियावर चर्चेचे तुफान
4

‘होय मी जय भीमवाली…’ ’या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे बेधडक विधान, सोशल मीडियावर चर्चेचे तुफान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.