Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेख हसिना यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

बांग्लादेशच्या पंतप्रधानाच्या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अभिनेत्री नुसरत फारिया हिला रविवारी सकाळी ढाका विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 18, 2025 | 07:53 PM
शेख हसिना यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

शेख हसिना यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारिया सध्या कमालीची संकटात अडकली आहे. बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबुर रहमान यांच्या ‘मुजीबः द मेकिंग ऑफ अ नेशन’ या बायोपिकमध्ये अभिनेत्री नुसरत फारियाने बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हासिना यांची भूमिका साकारली होती. बांग्लादेशच्या पंतप्रधानाच्या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अभिनेत्री नुसरत फारिया हिला रविवारी सकाळी ढाका विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे.

‘बिग बॉस १८’ फेम अभिनेत्रीची अचानक बिघडली तब्येत, अवॉर्ड फंक्शन सोडून थेट गाठलं हॉस्पिटल

जुलै २०२४ मध्ये बांग्लादेशामध्ये शेख हसीना यांच्याविरोधात छेडलेल्या जनआंदोलनादरम्यान हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिनेत्रीवर करण्यात आला होता. यावेळी हत्येच्या प्रयत्नासंबंधित एका प्रकरणात नुसरत फारियाला अटक करण्यात आली आहे. ३१ वर्षीय अभिनेत्री नुसरत फारिया आज सकाळी थायलंडला जाण्यासाठी ढाकामधील शाहजहाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली असताच तिला पोलिसांकडून अटक करण्यात आल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे.

‘स्वदेस’च्या सेटवर शुटिंग दरम्यान शाहरुख खानचा झालेला अपघात, चित्रपटातील अभिनेत्याने सांगितला किस्सा; म्हणाला “आशुतोष चिडला पण…”

बड्डा झोनचे सहाय्यक पोलिस आयुक्त शफीकुल इस्लाम यांनी स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीच्या अटकेची पुष्टी केली. विमानतळावरील इमिग्रेशन विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला अटक वॉरंटही जारी करण्यात आला आहे. अभिनेत्री नुसरत फारियाला अटक झाल्यानंतर ढाकामधील वातारा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर तिची रवानगी ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या गुप्तहेर शाखेच्या कार्यालयात करण्यात येईल, असे वृत्त प्रथम आलो वृत्तपत्राने दिले आहे.

विराट कोहलीने अनब्लॉक करताच राहुल वैद्यचे सूर बदलले, ‘जोकर’ म्हटल्यानंतर आता कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

२०२३ मध्ये आलेल्या ‘मुजिब: द मेकिंग ऑफ अ नेशन’ या चित्रपटात शेख हसीनाच्या भूमिकेच्या माध्यमातून अभिनेत्री नुसरत फारियाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट बांगलादेश आणि भारताच्या संयुक्त प्रयत्नातून बनवण्यात आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन भारताचे प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी केला होता. अभिनयात करिअर करण्यापूर्वी नुसरतने रेडिओ जॉकी आणि प्रेझेंटर म्हणून काम केले. तिने २०१५ मध्ये बांगलादेश-भारत सहयोग ‘आशिकी: ट्रू लव्ह’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक बांगलादेशी आणि भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती बहुतेक बंगाली चित्रपटांमध्ये दिसली. ती टेलिव्हिजन होस्टिंग आणि मॉडेलिंगमध्ये देखील सक्रिय आहे.

Web Title: Bangladeshi actress nusrat faria arrested in murder case heroine played sheikh hasina role film mujib the making of a nation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 07:53 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bollywood
  • Bollywood Actress

संबंधित बातम्या

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
1

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत
2

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड
3

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी
4

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.