Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blind Asia Cup : बांगलादेशला नमवत भारताची फायनलमध्ये धडक; 20 नोव्हेंबरला पाकिस्तानशी महामुकाबला!

Blind Asia Cup : ब्लाइंड आशिया कप 2026 मध्ये भारताने बांगलादेशचा 8 विकेट्सनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. सुनील रमेशच्या नाबाद 63 धावांच्या जोरावर भारताने 13.2 षटकांत लक्ष्य पूर्ण केले. 20 नोव्हेंबरला पाकिस्तानशी अंतिम सामना होणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 18, 2026 | 08:55 PM
Blind Asia Cup : बांगलादेशला नमवत भारताची फायनलमध्ये धडक; 20 नोव्हेंबरला पाकिस्तानशी महामुकाबला!

Blind Asia Cup : बांगलादेशला नमवत भारताची फायनलमध्ये धडक; 20 नोव्हेंबरला पाकिस्तानशी महामुकाबला!

Follow Us
Follow Us:
  • भारताचा 8 विकेट्सनी विजय
  • सुनील रमेशची नाबाद 63 धावांची खेळी
  • आता पाकिस्तानविरुद्ध विजयाचे लक्ष्य
 

Blind Asia Cup : ब्लाइंड आशिया कप 2026 मध्ये भारतीय दृष्टिबाधित क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बुधवारी ढाका येथे झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने यजमान बांगलादेशचा 8 विकेट्सनी पराभव केला.
आता 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. साखळी फेरीत पाकिस्तानकडून झालेल्या एका विकेटच्या निसटत्या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाला मिळणार आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करत बांगलादेशला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 123 धावांवर रोखले. कर्णधार टी. दुर्गा रावने तीन षटकांत 10 धावा देत एक विकेट घेतली. लोकेशा, देबराज बेहेरा आणि सुनील रमेश यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
भारतीय क्षेत्ररक्षकांनीही तीन फलंदाजांना धावबाद करत बांगलादेशच्या धावसंख्येला आळा घातला. बांगलादेशकडून मुहम्मद तहाफिजने 30 चेंडूंत नाबाद 36 धावा केल्या.

सुनील रमेशची नाबाद अर्धशतकी खेळी

124 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. सुनील रमेशने नाबाद 63 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 41 चेंडूंचा सामना करत सात चौकारांसह ही धावसंख्या उभारली. त्याचा स्ट्राइक रेट 153.66 इतका होता.

संजय कुमार शाहने 25 चेंडूंत 32 धावा करत त्याला चांगली साथ दिली. तर सुखरामने 15 चेंडूंत नाबाद 20 धावा केल्या. भारताने अवघ्या 13.2 षटकांत 2 बाद 124 धावा करत ४० चेंडू राखून विजय मिळवला.

 

पाकिस्तानविरुद्ध विजयाचे लक्ष्य

अंतिम सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार टी. दुर्गा राव यांनी संघाचा आत्मविश्वास व्यक्त केला. बांगलादेशविरुद्धच्या विजयामुळे संघाला अंतिम सामन्यासाठी बळ मिळाले आहे. साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध केवळ एका विकेटने पराभव झाला होता. त्या सामन्यातील चुका लक्षात घेऊन 20 नोव्हेंबरला सर्वोत्तम कामगिरी करण्यावर संघाचे लक्ष असेल, असे त्यांनी सांगितले.

भारतामधील दृष्टिबाधितांसाठी क्रिकेट संघटनेचे (सीएबीआय) अध्यक्ष डॉ. महांतेश जी. के. यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले. संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असून, पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यातही संघ विजेतेपद मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्लाइंड आशिया कप 2026 च्या अंतिम फेरीत कोणते संघ खेळणार आहेत?

    Ans: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 20 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे.

  • Que: भारताने उपांत्य सामन्यात कोणत्या संघाचा पराभव केला?

    Ans: भारताने यजमान बांगलादेशचा 8 विकेट्सनी पराभव केला.

  • Que: भारताचा पाकिस्तानविरुद्ध साखळी फेरीत काय निकाल लागला होता?

    Ans: साखळी फेरीत भारताला पाकिस्तानकडून एका विकेटने निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. आता अंतिम सामन्यात भारताला त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.

Web Title: India reach blind asia cup 2026 final beat bangladesh pakistan rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 08:55 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Bangladesh
  • blind people

संबंधित बातम्या

Ganga Water Treaty : गंगेच्या पाण्यासाठी बांगलादेशची भारताकडे विनवणी; 30 वर्षांचा ऐतिहासिक करार संपण्यापूर्वी चर्चेची मागणी
1

Ganga Water Treaty : गंगेच्या पाण्यासाठी बांगलादेशची भारताकडे विनवणी; 30 वर्षांचा ऐतिहासिक करार संपण्यापूर्वी चर्चेची मागणी

Bangladesh : शेख हसीनांच्या ‘त्या’ पत्रकार परिषदेमुळे बांगलादेशचा तीळपापड; पंतप्रधान तारिक रहमान यांनी रद्द केला भारत दौरा
2

Bangladesh : शेख हसीनांच्या ‘त्या’ पत्रकार परिषदेमुळे बांगलादेशचा तीळपापड; पंतप्रधान तारिक रहमान यांनी रद्द केला भारत दौरा

U-19 Asia Cup: भारत – पाकिस्तान आमनेसामने, कसा आहे Head-To-Head रेकॉर्ड; भारत उगवणार का सूड?
3

U-19 Asia Cup: भारत – पाकिस्तान आमनेसामने, कसा आहे Head-To-Head रेकॉर्ड; भारत उगवणार का सूड?

Sheikh Hasina : चीनसोबतच्या लढाऊ विमान करारावर शेख हसीनांचे प्रश्नचिन्ह; म्हणाल्या, आर्थिक क्षमता तपासा
4

Sheikh Hasina : चीनसोबतच्या लढाऊ विमान करारावर शेख हसीनांचे प्रश्नचिन्ह; म्हणाल्या, आर्थिक क्षमता तपासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.