Bigg Boss 18 Fame Edin Rose Gets Hospitalised an Hour before Award Show
‘बिग बॉस १८’ फेम अभिनेत्री एडिन रोज (Edin Rose) संबंधित एक महत्वाची बातमी समोर येत आहे. एका अवॉर्ड शोमध्ये सहभागी होत असताना अचानक रात्री अभिनेत्रीची तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्यामुळे अभिनेत्रीला तात्काळ मुंबईच्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. खरंतर, अभिनेत्री झी सिने अवॉर्ड या सोहळ्याला हजेरी लावणार होती. पण अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावण्याआधीच अचानक तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, एडिन रोज हिला इमरजेन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या त्या वॉर्डमध्ये तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. नेमकं अभिनेत्रीला कोणत्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. शनिवारी रात्री एडिन रोझने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रुग्णालयाच्या बेडवरून काढलेला फोटो शेअर केला होता. त्या फोटोला अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, “खरोखर नजर लागते. मी झी सिने अवॉर्ड्ससाठी तयारी करत होते, डिझायनर आउटफिट, केस, मेकअप, दागिने, पापाराझी, सर्वकाही नियोजित होते. त्या अवॉर्ड फंक्शनच्या फक्त एक तासापूर्वीच मला रुग्णालयाच्या इमरजेन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. आपल्या आयुष्यामध्ये केव्हा काय होईल आणि काय नाही होणार, याचा कोणालाच भरोसा नाही. काहीही असो, मी आता काही काळ सोशल मीडियावर राहणार नाही. कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा.”
Kartik Aaryan च्या आनंदाला नाही उरला पारावार, खास क्षणांचे फोटो शेअर करत म्हणाला…
एडिनची इन्स्टा स्टोरी पाहून चाहते तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या एडिनने अचानक हॉस्पिटलमधील फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. अलीकडेच, एडिनने इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोशूट पोस्ट केले होते. ती किती काळ रुग्णालयात राहील हे त्यांनी अद्याप सांगितलेले नाही. ती लवकरच बरी होऊन घरी येईल असा विश्वास तिच्या चाहत्यांना आहे. एडिन रोझने ‘बिग बॉस १८’ शोमध्ये वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली होती. २६ वर्षीय एडिन रोझ नेहमीच तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. तिचे लूक कायमच इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. मॉडेल आणि अभिनेत्री एडिन रोझचा जन्म दुबईमध्ये झाला आहे. पण ती आपलं फिल्मी करियर करण्यासाठी भारतामध्ये राहायला आली. ‘रावणासुर’ या तेलुगू चित्रपटातून सुपरस्टार रवी तेजासोबत एका खास डान्स नंबरमध्ये दिसली. अलीकडेच ती सलमान खानच्या ‘बिग बॉस १८’ शोमध्ये दिसली.