कधी, कुठे पाहता येणार यावर्षी बिग बॉस १९ (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सलमान खानचा शो बिग बॉस १९ हा नेहमीच चर्चेचा विषय आहे. अनेक जण या शो ला शिव्याही देतात पण याचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. बिग बॉसमधील खेळ आणि त्याशिवाय आपले आवडते अभिनेते वा अभिनेत्री कशा पद्धतीने खऱ्या आयुष्यात वागतात हे सर्वांनाच जाणून घ्यायचे असते आणि त्यामुळे हा शो गेले १९ वर्ष चालू आहे आणि दिवसेंदिवस याची प्रसिद्धी वाढतेच आहे. चाहते या शोच्या प्रसारणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
बरं, त्याच्या भव्य प्रीमियरसाठी फक्त एक दिवस उरला आहे, आणि अशा परिस्थितीत हा वादग्रस्त रियालिटी शो कधी आणि कुठे पाहायचा हे जाणून घेण्यासाठी सर्वांना उत्सुकता लागून राहिली असेल, म्हणून बिग बॉस १९ शी संबंधित प्रत्येक तपशील तुमच्यासाठी खास या लेखातून आम्ही देत आहोत.
या वर्षी, ‘बिग बॉस १९’ चे स्वरूप बदलण्यात आले आहे. दरवर्षी बिग बॉस जिओ हॉटस्टार आणि टीव्हीवर एकाच वेळी प्रीमियर होत असे, परंतु यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मचा वरचष्मा आहे आणि यामुळेच प्रत्येक भाग जिओ हॉटस्टारवर दीड तास आधी प्रसारित केला जाईल. यासोबतच, हा शो रात्री ९ वाजता जिओ हॉटस्टारवर प्रसारित केला जाईल. त्यामुळे टीव्हीच्या आधी तुम्ही जिओ हॉटस्टारवर हा शो पाहू शकता आणि मजा घेऊ शकता. नंतर तो रात्री १०:३० वाजता कलर्स टीव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहे. तर, प्रीमियर होताच तो पाहू इच्छिणारे सर्व चाहते जिओ हॉटस्टारचा पर्याय निवडू शकतात. कलर्स टीव्हीचा अनुभव आवडणारे प्रेक्षक दररोज कलर्स टीव्हीवर नवीन एपिसोड पाहू शकतात.
Bigg Boss 19: अखेर ‘हे’ १८ स्पर्धक दिसणार ‘बिग बॉस’च्या घरात; जाणून घ्या संपूर्ण यादी
टीझरमध्ये, सलमान खानने या वर्षीच्या थीममधील एक मोठा ट्विस्ट उघड केला आणि सांगितले की सीझन १९ मध्ये “घरवालों की सरकार” असेल जो घरातील सत्तेत मोठा बदल दर्शवितो असे सांगितले आणि त्याने “प्रचंड मजा” येणार असल्याचे आश्वासनदेखील दिले आणि सर्वांना तयार राहण्याची विनंती केली. टीझरमध्ये, सलमान खान आकर्षक नेहरू जॅकेट परिधान करताना दिसत आहे आणि त्याच्यासोबत ब्लॅक कॅट कमांडो आहेत.
शोमधील नवीन ट्विस्टबद्दल बोलताना, सलमान खान एका निवेदनात म्हणाला, “मी खूप वर्षांंपासून बिग बॉसचा भाग आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की, बिग बॉस दरवर्षी हा गेम नव्याने निर्माण करत असतो आणि यावेळी, तो घरवालों की सरकार आहे, आणि सुरूवातील एकमेकांना जाणून घेणारे लोक नंतर आपले रंग दाखवू लागतात आणि मग नात्यात तेव्हा भेगा पडू लागतात आणि घर युद्धभूमीत बदलते. इतक्या वर्षांनंतर, मी खरोखर म्हणू शकतो की हे सर्व कसे घडते हे पाहण्यासाठी मी देखील तुमच्याइतकाच उत्साहित आहे.”
Bigg Boss 19 च्या सेटवरून Salman Khan चा पहिला लूक समोर, भाईजानचा स्वॅग Viral
जरी अधिकृत स्पर्धकांची यादी अद्याप जाहीर झालेली नसली तरी, बिग बॉस १९ च्या सीझनमध्ये अशनूर कौर, गौरव खन्ना, झीशान कादरी, पायल धारे, धीरज धूपर आणि अवेज दरबार आणि नगमा मिराजकर सारखे प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर्स सहभागी होण्याची शक्यता आहे. स्पर्धकांचे प्रोमोही नुकतेच प्रसारित करण्यात आले असून सोशल मीडियावर पुन्हा नावांची धमाकेदार चर्चा रंगताना दिसत आहे.