(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सलमान खानने लडाखमध्ये सुरु केले ‘Battle of Galwan’चे शूटिंग, BTS फोटोने वाढली उत्सुकता
बिग बॉस १९ मध्ये कोणते स्पर्धक सहभागी?
सलमान खानच्या बिग बॉस १९ च्या स्पर्धकांबद्दल खूप शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाल्या होत्या. पण आता ही शंका पूर्णपणे दूर झाली आहे. कारण शोची कन्फर्म लिस्ट समोर आली आहे. यावेळी शोमध्ये अशनूर गौर, नेहल चुडासमा, नगमा मिराजकर, तानिया मित्तल, नटाइला, नीलम गिरी, झीशान कादरी, गौरव खन्ना, बसीर अली, अभिषेक बजाज, अमल मलिक, मृदुल तिवारी, आवाज दरबार, शाहबाज बदेशा, प्रणित मोरे, डिनो जेम्स, कुनिचका सदानंद आणि अतुल किशन यांसारख्या कलाकारांची नावे आहेत.
‘हा’ दिग्गज अभिनेता देखील होणार सामील
तसेच, अशी बातमी देखील समजली आहे की प्रसिद्ध बॉक्सर माइक टायसन देखील सलमान खानच्या लोकप्रिय शोमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याचे नाव देखील समोर ले आहे. तसेच, अभिनेत्याने शोने दिलेल्या प्रस्तावावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. जर असे झाले तर चाहते खरोखर आनंदी होतील आणि शोचे उर्वरित स्पर्धक अडचणीत येतील. आता बॉक्सर माइक टायसन सहभागी होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’ चित्रपटाचा टीझर रिलीज, दिसणार एक अनोखी लव्हस्टोरी
सलमान खानचा बिग बॉस १९ कधी आणि कुठे पाहायचा?
सलमान खानचा हा लोकप्रिय शो खूप पुढे आला आहे आणि त्याची १९ वी आवृत्ती घेऊन सलमान खान येण्यास सज्ज झाला आहे. शोची स्पर्धक यादी आता समोर आली आहे. यावेळी सलमान खानचा शो ३ ऐवजी ५ महिने दाखवला जाणार असल्याचे समजले आहे. तुम्ही हा शो कलर्स वाहिनीवर रात्री १०:३० वाजता पाहू शकता.






