
अभिजितबरोबर अन्याय झाला का
गेल्या ७० दिवसांपासून चर्चेत असणारा मराठी रिलालिटी शो बिग बॉस मराठी अखेर संपला आहे. सूरज चव्हाण या सीझनचा विजेता ठरलाय. पहिल्या दिवसापासून सूरजच्या नावाची चर्चा होती. मात्र खरा खेळ खरंच सूरज खेळलाय का? असा प्रश्न विजेता झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांकडून विचारला जातोय. खेळ म्हणून आता बिग बॉसकडे पाहायचं की सिम्पथी मिळविणाऱ्यांनाच आता विजेता करणार असा सवालही विचारला जातोय.
सोशल मीडियावर अनेकांनी चॅनेल आणि क्रिएटिव्ह हेड यांना पत्रही लिहून ठेवली होती आणि ती पत्रं व्हायरलही झाली होती. सूरजला तुम्ही काम द्या पण खरा विजेता हा अभिजीत सावंत आहे त्यामुळे ट्रॉफी त्याला मिळू द्या अशी विनंतीही ही पत्रं व्हायरल होऊनही विजेता मात्र सूरज ठरल्यामुळे बिग बॉस या खेळाचे चाहते नक्कीच नाराज झालेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
कोण होतं डिझर्व्हिंग
सूरज चव्हाण हे नाव अनेकांना टिकटॉक स्टार म्हणून माहीत होतं. ज्याला या शो मध्ये येण्याची इच्छाही नव्हती आणि त्याला या खेळातील अगदी अ पासून शिकवण दिली ती पंढरीनाथ कांबळे, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर प्रभू यांनी. मात्र तरीही जिंकला सूरज? असे का आणि याची कारणं काय असू शकतात अशीही चर्चा आता रंगली आहे.
काय म्हणतात प्रेक्षक
ग्रामीण भागातील प्रेक्षकांना खेचणे
चॅनेलने काहीही केले असेल तरी हा योग्य निर्णय नाही हेच सर्वांचे म्हणणे आहे. अभिजित सावंत हा पहिल्या दिवसापासून स्ट्रेटेजी आणि खेळात पुढे राहिला आणि तरीही जिंकवण्यात आले सूरज चव्हाणला. किती मतं पडली? याबाबत काहीही चर्चा नाही, काहीच सांगण्यात आले नाही. केवळ ग्रामीण भागातील प्रेक्षकांना खेचणे हाच हेतू असेल तर मग खेळाची गरजच काय असाही सवाल एका युजरने केलाय.
शेवटपर्यंत गेमची समज नाही
सूरजला शेवटपर्यंत गेमची कोणतीही समज नव्हती. त्याला कायम कोणाचा ना कोणाचा आधार लागला. प्रत्येक व्यक्तीने जसे सांगितले तसंच त्याने केले. त्याने कधीही स्वतःच्या मताप्रमाणे काहीही केल्याचे दिसून आले नाही. मग असे असतानाही सूरज चव्हाण कसा विजेता ठरू शकतो? जर सिम्पथी होती तर त्याला काम देण्यात यावं, विजेता ठरवणं चूक आहे असंही आता सोशल मीडियावर म्हटलं जातंय.
अरबाज – निक्कीचा खेळ अधिक चांगला
जर खेळाच्या दृष्टीने पाहायचं असेल तर खेळात जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, अभिजीत सावंत आणि पंढरीनाथ कांबळे यांनी अधिक चांगला खेळ केला होता हेदेखील सर्वांना मान्य आहे. त्यामुळे आता याबाबत अधिक चर्चा उपस्थित होताना दिसून येत आहे. सूरजला सिम्पथी म्हणून काम देणे योग्य आहे मात्र खेळ कसा असावा यासाठी या सर्व स्पर्धकांनी जीव तोडून मेहनत केलेली दिसून आली आहे.
खेळ महत्त्वाचा
बिग बॉसमध्ये नेहमी खेळ आणि स्ट्रॅटेजी महत्त्वाची असते आणि असं असतानाही कोणत्याही स्ट्रॅटेजीशिवाय सूरज कसा जिंकू शकतो? ज्याला खेळाची अजिबात समज नाही अशा व्यक्तीला केवळ ग्रामीण भागातील आहे आणि त्याला चॅनेलकडून मोठं करण्यात आलं अशीही चर्चा आता रंगली आहे. तर अभिजित सावंतने आपल्या खेळाने सर्वांचं मन जिंकलं असल्याचंही म्हटलं जातंय. तरीही हा निर्णय़ कितपत योग्य आहे यावर प्रश्नचिन्हच निर्माण झाल्याचं चित्र सध्या आहे.