मराठी गायक अभिजीत सावंत आज त्याचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. एकेकाळी टिनाच्या शेडमध्ये राहणारा गायक अभिजीत सावंत आज कोट्यवधीं संपत्तीचा मालक आहे. बिग बॉस मराठी ५ सिझन मध्ये अभिजीत सहभागी होताना दिसला आणि बिग बॉस मराठी ५ चा उपविजेता देखील झाला आहे. 'इंडियन आयडॉल 1' चा विजेता झाल्यानंतर अभिजीतने बऱ्याच वर्षानंतर बिग बॉस मराठी ५ मध्ये सहभागी होऊन पुन्हा या इंडस्ट्रीमध्ये नव्याने सुरुवात केली. बिग बॉसच्या घरातील त्याचा खेळ पाहून प्रेक्षकांच्या मनात या गायकाने वेगळेच स्थान निर्माण केले.
पत्र्याच्या शेडमध्ये राहायचा अभिजीत सावंत आज आहे कोट्यवधीं संपत्तीचा मालक (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
'इंडियन आयडॉल 1' चा पहिला विजेता-गायक अभिजीत सावंत बऱ्याच दिवसांपासून प्रसिद्धीपासून दूर होता, त्यानंतर त्याने बिग बॉस मराठी सीझन 5 मधून पुन्हा एकदा कमबॅक केले. आणि हा कमबॅक चाहत्यांना खूप आवडला.
मावशीसोबत तिच्या टीन पत्र्याच्या झोपडीत राहण्यापासून ते रिॲलिटी शो जिंकण्यापर्यंतचा अभिजीतचा प्रवास फारच संघर्षमय होता. इंडियन आयडॉल जिंकल्यानंतरही त्याला इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करावा लागला.
पहिला इंडियन आयडॉल शो जिंकल्यानंतर अभिजीत सावंतचा पहिला अल्बम 'आपका अभिजीत सावंत' 2005 साली रिलीज झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनंतर, 2007 मध्ये अभिजीत सावंतचा 'जुनून' हा दुसरा अल्बम प्रदर्शित झाला.
दरम्यान, अभिजीत सावंतने अनेक चित्रपटांमध्ये आवाजाची जादू दाखवली आहे. 'आशिक बनाया आपने', 'तीस मार खान', 'इश्क वाला लव' आणि 'ढिशूम' यांसारख्या चित्रपटांसाठी अभिजीत सावंतने गाणी गायली आहेत.
नुकताच अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये सामील झाला होता. ज्यामध्ये तो टॉप 2 फायनलिस्टपैकी एक होता. मात्र हा शो जिंकता आला नसला तरी, तो शोमध्ये 14 आठवडे राहून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसला.
बिग बॉस शोसाठी अभिजीतने दर आठवड्याला सुमारे 3.5 लाख रुपये फी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत सावंत सुमारे 1.2 ते 8 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.