(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” असं म्हणत सुरू झालेल्या ‘बिग बॉस मराठी ६’ च्या अभूतपूर्व यशाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या सिझनच्या पहिल्याच आठवड्यात रितेश भाऊंने सर्वांचं मन जिंकलं आहे. रितेश भाऊंचा तोच कडक अंदाज, त्यांचा जबरदस्त स्वॅग आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची त्यांची खास शैली यामुळे हा सिझन घराघरांत पोहोचला आहे. रितेश भाऊंच्या जादूने यंदा केवळ टीव्हीच नाही, तर डिजिटल जगतावरही अधिराज्य गाजवलं असून, खऱ्या अर्थाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली मोहोर उमटवली आहे. कलर्स मराठी आणि JioHotstar वर एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या या सिझनने लोकप्रियतेचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.
कलर्स मराठीवर, ग्रँड प्रीमियर आणि दैनंदिन भागांना जोरदार सुरुवात मिळाली असून, लाँचिंगच्या पहिल्याच आठवड्यात ३३ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या आगमनामुळे मराठी जनरल एंटरटेनमेंट चॅनेलच्या (GEC) प्रेक्षकसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे; ३४ GRPs वरून ७७ GRPs पर्यंत झालेली ही २.३ पट वाढ या शोची जनमानसातील पकड अधोरेखित करते. JioHotstar, पहिल्या भागाच्या ‘रीच’मध्ये ५ व्या सीझनच्या प्रीमियरच्या तुलनेत २.२ पट आणि ‘वॉच-टाइम’मध्ये ६.५ पट वाढ नोंदवण्यात आली. पहिल्या आठवड्यात JioHotstar वर देखील हा वेग कायम राहिला; गेल्या सीझनच्या तुलनेत व्हिडिओ व्ह्यूजमध्ये १.८ पट आणि वॉच-टाइममध्ये १.३ पट वाढ झाली असून, हे प्रेक्षकांचा वाढता कल आणि वारंवार पाहिल्या जाणाऱ्या संख्येचे निदर्शक आहे..
या अभूतपूर्व यशाचे मोठे श्रेय महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार आणि शोचा होस्ट रितेश देशमुख यांना देखील जाते आहे. प्रोमो रिलीज झाल्यापासूनच रितेश भाऊंच्या कडक डायलॉग्सनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तय्यार!” या त्यांच्या वाक्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. ग्रँड प्रीमियर च्या दिवशी रितेश भाऊंचा तो अस्सल महाराष्ट्रीयन स्वॅग, ‘लार्जर-दॅन-लाईफ’ परफॉर्मन्स आणि त्यांच्या एन्ट्री ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यांचं प्रभावी सूत्रसंचालन, आणि त्यांच्या शब्दांमधली धार यामुळे ग्रँड प्रीमियरची रंगत अजूनच वाढली. या सगळ्यामुळेच सिझन ६ चा ग्रँड प्रीमियर हा विक्रमी टीआरपी मिळवणारा कार्यक्रम ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात १७ सदस्यांनी मोठ्या दिमाखात एन्ट्री घेतली, आणि संपूर्ण आठवडा प्रेक्षकांना राडा, भांडणं, मैत्री, याने खिळवून ठेवले.
O Romeo च्या ट्रेलर लाँच दरम्यान भडकले नाना पाटेकर, अर्ध्यातूनचं सोडला कार्यक्रम; Video Viral
यंदाच्या सिझनची थीम “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” ही केवळ थीमच नाही, तर प्रत्यक्ष घरातील टास्क मध्ये दिसून येत आहे. घरातील अतरंगी सदस्य, त्यांची ‘कल्ला’ करण्याची पद्धत आणि १०० कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत बदलणारी नाती प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहेत. ११ जानेवारी रोजी सुरू झालेला हा प्रवास आता रोज प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल बोलताना सतीश राजवाडे म्हणाले, “बिग बॉस मराठी च्या या अभूतपूर्व यशाचा खरा मानकरी आपला प्रेक्षक आहे. टेलिव्हिजन रेटिंगचा हा चढता आलेख आणि JioHotstar वर मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप अभिमान वाटतोय. ‘बिग बॉस मराठी आणि भाऊच्या धक्क्या’ वर महाराष्ट्र जो विश्वास दाखवतोय, त्यासाठी आम्ही मनापासून प्रेक्षकांचे ऋणी आहोत. अजून तर खेळ सुरू झाला आहे, पुढे अजून रंगत वाढणार हे नक्की!”






