(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात केवळ वादच नाही, तर कधीकधी खेळीमेळीच्या वातावरणात महत्त्वाची शिकवणही दिली जाते. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये विशाल घरातील प्रभूला भाषेच्या वापराबाबत महत्त्वाची समज देताना दिसत आहे. विशाल प्रभूला शब्दांचा फरक समजावता दिसत आहे. ज्यामुळे हा नवा प्रोमो चर्चेत आला आहे. तसेच चाहत्यांना विशालचा हा नवा अंदाज देखील खूप आवडला आहे. ‘बिग बॉस’च्या प्रोमोमध्ये नक्की काय दाखवले आहे जाणून घेऊयात.
प्रोमो मध्ये नक्की काय घडलं?
घरात विशाल, प्रभूं अनुश्री यांच्यात गप्पा सुरु असताना प्रभूने विशालला त्याच्या किती ‘आयटम’ आहेत, असा प्रश्न विचारला. प्रभूच्या तोंडून हा शब्द ऐकताच विशालने त्याला तात्काळ थांबवले. ‘आयटम’ किंवा ‘माल’ असे शब्द वापरणे चुकीचे आहे, असे त्याने प्रभूला सांगितले. मग यावर प्रभू म्हणाला, “तुमचे किती आयटम आहेत?”, विशाल म्हणाला, “हे आयटम काय बोलतोय? आयटम नाही बोलायचं. गर्लफ्रेंड किती आहेत असं विचार, ते ठीक आहे. माल, आयटम असे शब्द नाही वापरायचे. यावर प्रभू पुन्हा म्हणतो, “आमच्या गावाकडे आयटमच म्हणतात. गर्लफ्रेंड म्हटलं की राग येतो तिकडे.”
पुढे विशाल प्रभूला म्हणताना दिसला आहे, “आता गावात जाऊन सांग की असं नाही बोलायचं. मी बिग बॉसकडून शिकून आलोय की हे चुकीचं आहे.” नंतर प्रभू म्हणाला, “किती जाग्यावर सेटिंग आहे?” मग विशाल हसत गंमतीत म्हणतो, “खूप! मोजल्या नाहीत कधी, मोजल्या की कमी होतात.” ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ मधील हा प्रोमो सगळ्यात खास राहिला आहे. तसेच चाहत्यांनी या प्रोमो व्हिडीओवर भरभरून कंमेंट करून प्रतिसाद देखील दिला आहे.
तसेच ‘बिग बॉस’चा आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात प्रचंड मोठे भांडण झाल्याचे दिसत आहे. अलिकडेच या दोघांमध्ये या आधी ही भांडण झाल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आणि या भांडणात अनुश्रीने राकेश बद्दल एक चुकेचं वक्तव्य केलं होते. त्यावेळी मराठी कलाकरांनी राकेशला पाठिंबा दर्शवला होता. आता पुन्हा या दोघांमध्ये राडा होताना दिसणार आहे.






