फायनल व्होटिंग रँकिंगमध्ये कोणाची हवा, जनतेचा कौल कोणाला ?
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा आज ग्रँड फिनाले आहे. आज अवघ्या महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनसाठी विजेता मिळणार आहे. त्यामुळे बिग बॉस चाहते आज प्रचंड उत्सुक आहेत. १० आठवडे आणि ७० दिवस प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल्यानंतर बिग बॉसला शेवटचे सुपर ६ स्पर्धक मिळाले आहेत. २८ जुलैपासून सुरु झालेल्या या सीझनमध्ये एकूण १७ स्पर्धकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. यामध्ये, सुरूवातीला १६ स्पर्धक आणि १ वाईल्ड कार्ड स्पर्धकाचा समावेश आहे. ग्रँड फिनालेसाठी सध्या अवघे काही तासंच शिल्लक राहिले आहेत. प्रेक्षक फायनॅलिस्ट स्पर्धकांना भरभरून मतं देत आहेत, पण व्होटिंग ट्रेंड्समध्ये कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर आहेत जाणून घेऊया…
हे देखील वाचा – बिग बॉस मराठीच्या विजेत्याला किती मिळणार बक्षीस रक्कम!
बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये यंदा टॉप ५ नाहीत तर टॉप ६ फायनालिस्ट स्पर्धक आहेत. सुरज चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजित सावंत, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे स्पर्धक टॉप ६ मध्ये आहेत. या सुपर ६ स्पर्धकांपैकी कोण जिंकणार याबद्दल जाणून घेण्यास सगळेचजण उत्सुक आहेत. बिग बॉस मराठीचे काही लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स समोर आले आहेत. बिग बॉस मराठी फॉलो करणाऱ्या काही फॅन्स पेजेसनी हे इन्साईड वोटिंग ट्रेंड्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सीझनचा विजेता कोण ठरणार हे आज संध्याकाळी पाहायला मिळणार आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या महाअंतिम सोहळ्यासाठी अवघे काही तासंच शिल्लक राहिले आहेत. ‘Bigg Boss Marathi Era’ या पेजने शेअर केलेल्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार, गोलिगत सूरज चव्हाण ह्याला सर्वाधिक जास्त वोट्स मिळालेले दिसत आहे. सर्वाधिक आघाडीवर तोच आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त मतं कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिला पडले आहेत. वोटिंग ट्रेंडनुसार, सूरज आणि अंकितामध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगलेली पाहायला मिळतेय. संपूर्ण सीझनमध्ये वोटिंग ट्रेंडमध्ये पहिलं किंवा दुसरं स्थान टिकवून राहणारा अभिजीत सावंत शेवटच्या आठवड्यात मात्र वोटिंगच्या रेसमध्ये तिसऱ्या स्थानावर गेला आहे. निक्कीशी पुन्हा झालेली त्याची मैत्री अनेकांना खटकलेली आहे, असं वोटिंग ट्रेंडमधून दिसत आहे.
हे देखील वाचा – निया शर्माने चाहत्यांची मागितली माफी! बिग बॉसची एंट्री एक पब्लिसिटी स्टंट…
धनंजय पोवार चौथ्या स्थानावर तर पाचव्या स्थानावर निक्की तांबोळी आणि शेवटी म्हणजेच सहाव्या स्थानावर जान्हवी किल्लेकर दिसत आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेल्या धनंजयला बिग बॉसच्या घरात त्याचा हवा तसा खेळ दाखवता आला नाहीये, याचा परिणाम स्पष्ट वोटिंग ट्रेंडमध्ये दिसतोय. निक्की तांबोळी पाचव्या स्थानावर आणि जान्हवी किल्लेकर शेवटच्या सहाव्या स्थानावर आहे. पुन्हा एकदा निक्की आणि जान्हवीचा झालेली हातमिळवणीही प्रेक्षकांना खटकलेली दिसतेय. फॅन पेजेसनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या ट्रेंडपेक्षा ग्रँड फिनालेमध्ये होणारे एव्हिक्शन वेगळं असण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या विजेत्याला २५ लाख रुपये बक्षीस म्हणून रोख रक्कम मिळणार आहे. महाअंतिम सोहळ्यामध्ये बिग बॉस मराठीचा पाचव्या विजेता कोण होणार हे पाहण्यासाठी पाहायला विसरू नका ग्रँड फिनाले आज संध्याकाळी ६ वाजता कलर्स मराठी किंवा जिओ सिनेमावर कधीही.






