फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया
बिग बॉस मराठी सिझन ५ : बिग बॉस मराठी सिझन ५ चा आज फिनाले असणार आहे, त्यामुळे बिग बॉस चाहते आज प्रचंड उत्सुक आहेत आज या सीझनचा विजेता कोण असणार हे पाहण्यासाठी. आता बिग बॉस सिझन ५ मधील स्पर्धकांनी प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन केले. यामधील आता फक्त ६ स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. बिग बॉस मराठीच्या सिझन ५ चे सुरज चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजित सावंत, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे आता स्पर्धक टॉप ६ मध्ये आहेत. आज बिग बॉस ५ चा फिनाले संध्याकाळी ६ वाजता सुरु होणार आहे. आज शोचा विजेता घोषित होणार आहे, या शोच्या विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळणार यावर एकदा नजर टाका.
आज मराठी बिग बॉस सिझन ५ चा विजेता घोषित होणार आहे. या विजेत्याला २५ लाखांचे बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. सध्या विनरच्या शर्यतीत अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर हे आहेत. आजच्या या फिनालेच्या उत्सवामध्ये स्पर्धक आणि होस्ट रितेश देशमुख प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. आता बिग बॉसचा फिनाले सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत.
Super 6 दाखवणार Grand Finale मध्ये त्यांच्या डान्सचा जलवा🔥🕺🏻💃 ‘BIGG BOSS मराठी’चा Grand Finale, आज संध्या. 6 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर.#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo #GrandFinale pic.twitter.com/Z7kYZRo0Qp — Colors Marathi (@ColorsMarathi) October 6, 2024
वोटींगच्या शर्यतीत सध्या तीन स्पर्धक आघाडीवर आहेत. पहिल्या तीनमध्ये सुरज चव्हाण, अभिजित सावंत आणि अंकिता वालावलकर यांचा समावेश आहे. आता बिग बॉस मराठी सीझन 5 च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






