प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीने उरकला गुपचूप साखरपुडा, Photos Viral
अनेक कलाकार मंडळींच्या घरात लगीनघाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता येत्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. अशातच प्रसिद्ध हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री माधुश्री शर्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीला तिच्या वाढदिवशी खास सरप्राईज मिळालं आहे. अभिनेत्रीने तिच्या वाढदिवशीच गुपचूप साखरपुडा उरकला आहे. तिने साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे.
सई ताम्हणकर लवकरच देणार खास सरप्राईज; पोस्ट करत म्हणाली, ‘३ फेब्रुवारीला…’
वाढदिवसाचा आनंद साजरा करत असताना हा क्षण आयुष्य बदलणारा ठरला आणि माधुश्रीसाठी हा दुहेरी आनंदाचा प्रसंग बनला. या सरप्राइझने भारावून जाऊन माधुश्री म्हणाली, “आधीच माझा वाढदिवस खास वाटत होता, पण या स्पेशल मुव्हमेंटने माझा वाढदिवस आणखीन अविस्मरणीय बनवलं. हे पूर्णपणे माझ्यासाठी अनपेक्षित होतं. पण अगदी परिपूर्ण. त्याने घेतलेली मेहनत आणि प्रेमाने भरलेली ही योजना मला खरोखरच नशीबवान असल्याची जाणीव करून देत आहे.”
या प्रस्तावाचा आणखी एक खास भाग म्हणजे साखरपुड्याचे ठिकाण. जे त्याचे स्वतःचे हॉटेल आहे. VV हॉटेलमध्ये अभिनेत्रीचा वाढदिवस आणि साखरपुडा झाला. त्याने हा महत्त्वाचा क्षण आपल्या हृदयाच्या जवळच्या ठिकाणी आयोजित केला, ज्यामुळे तो अजूनच अधिक खास झाला. माधुश्री म्हणाली, “त्याने हे ठिकाण निवडणं हेच दर्शवतं की हा प्रस्ताव त्याच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. त्याच्या प्रेमाने आणि विचारपूर्वक केलेल्या या प्लॅनिंगमुळे मी अतिशय कृतज्ञ आहे.”
या प्रस्तावाने संपूर्ण संध्याकाळ एका जादुई क्षणात बदलली. वाढदिवस हा केवळ वयाच्या नवीन टप्प्याचा उत्सव न राहता नव्या प्रवासाची सुरुवात ठरला. माधुश्री म्हणाली, “हा माझ्यासाठी दुहेरी आनंद आहे—माझा वाढदिवस आणि आयुष्यातील सर्वात सुंदर प्रस्ताव एकाच दिवशी! मला कधीच वाटलं नव्हतं की हा दिवस अशी अद्भुत भेट घेऊन येईल.” तिच्या उत्साहात एक वेगळीच चमक होती.
तिच्या साखरपुड्याबद्दल बोलताना माधुश्री आनंदाने म्हणाली, “मी स्वतःला खूप नशीबवान समजते की तो माझ्या आयुष्यात आहे. त्याने एवढ्या प्रेमाने आणि विचारपूर्वक हे सगळं नियोजन केलं, यामुळे माझे मन भारावून गेले आहे. त्याच्या उपस्थितीमुळे प्रत्येक क्षण खास वाटतो, आणि आता भविष्यात काय होणार याची मला प्रचंड उत्सुकता आहे.”
रात्रीच्या सुंदर आकाशाखाली, समुद्राच्या लाटांच्या मधुर आवाजात आणि प्रियजनांच्या साक्षीने माधुश्री शर्माचा वाढदिवस एका संस्मरणीय क्षणात रूपांतरित झाला. वाढदिवसाचा हा दिवस केवळ आणखी एका वर्षाचा उत्सव न राहता, आयुष्यभर लक्षात राहणारा खास दिवस ठरला.