Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“‘छावा’चा भाग होण्यासाठी मी स्वतःला…”, चित्रपटाबद्दल सुप्रसिद्ध कथा- पटकथाकार काय म्हणाले ?

ओंकार महाजन यांची ही पहिली फिचर फिल्म असल्याने त्यांच्यासाठी हा खास अनुभव होता. त्यांचा हा आनंददायी क्षण त्यांनी सर्वांसोबत शेअर केला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 07, 2025 | 03:35 PM
"'छावा'चा भाग होण्यासाठी मी स्वतःला...", चित्रपटाबद्दल सुप्रसिद्ध कथा- पटकथाकार काय म्हणाले ?

"'छावा'चा भाग होण्यासाठी मी स्वतःला...", चित्रपटाबद्दल सुप्रसिद्ध कथा- पटकथाकार काय म्हणाले ?

Follow Us
Close
Follow Us:

१४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘छावा’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. कलाकार, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफर आणि व्हीएफएक्स हे सगळे कमाल आहेतच. पण, या व्यतिरिक्त चित्रपटाला लाभलेली कथा आणि पटकथा लिहिणारी टीमही तितकीच जबरदस्त आहे. ऐतिहासिक चित्रपट असल्याने त्याची मांडणी पडद्यावर योग्यरित्या होणे, हे खूप महत्वाचे असते आणि ही जबाबदारी लक्ष्मण उतेकर, ऋषी वीरमानी, कौस्तुभ सावरकर, उन्मन बनकर आणि ओंकार महाजन यांनी लीलया पेलली आहे. ओंकार महाजन यांची ही पहिली फिचर फिल्म असल्याने त्यांच्यासाठी हा खास अनुभव होता. त्यांचा हा आनंददायी क्षण त्यांनी सर्वांसोबत शेअर केला आहे.

रि- रिलीज झालेल्या Sanam Teri Kasam ला चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जबरदस्त कमाई

ओंकार महाजन म्हणतात, “फिचर फिल्म म्हणून हा माझा पहिला चित्रपट आणि पहिलाच चित्रपट इतक्या नामवंतं लोकांसोबत करायला मिळणे, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. यापूर्वी लक्ष्मण सरांसोबत मी असोसिएट म्हणून काम केले आहे. त्यामुळे या प्रोजेक्टसाठी त्याने पहिला फोन मला केला. मग हळूहळू त्यात एकेक जण सहभागी झाले. ऋषी सरांचे हिंदीवर प्रभुत्व असल्याने, कौस्तुभने यापूर्वी ‘लोकमान्य’साठी संवाद लिहिले आहेत, त्याचा इतिहासाचा अभ्यास आहे. उन्मननेही कौस्तुभसोबत काही चित्रपट केले आहेत. तर या सगळ्यांना घेऊन आमची एक टीम तयार झाली. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनपासून आमचे या चित्रपटावर काम सुरु झाले. सुरुवातीच्या काळात आमचे फक्त व्हिडीओ कॉन्फरन्सवर काम सुरु होते. साधारण दोन अडीच वर्षं आम्ही कथा, पटकथेवर काम केले आणि अखेर आज आमचा ‘छावा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ”

प्रसिद्ध टेलिव्हिजन सेलिब्रिटी कपलने लग्नाच्या ३ वर्षांनंतर दिली गुड न्यूज; अभिनेत्री म्हणाली, “बाळासाठी प्लॅनिंग करत नव्हतो, पण...”

विकी कौशलसारख्या अष्टपैलू अभिनेत्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल ओंकार महाजन म्हणतात, “विकी आणि आमच्या टीमचे पहिले संभाषण चित्रीकरण सुरु व्हायच्या आधी झाले होते. विकी पिअर्सिंग करण्यासाठी आला होता आणि स्क्रिप्टवर काम करत बसलो होतो. साधारण २०-२२ दिवसांनी चित्रीकरण सुरु होणार होते. आमच्यासाठी त्याला भेटण्याचा अनुभव कमाल होता. आम्ही तसे नवीन आहोत. मात्र विकी एक प्रसिद्ध अभिनेता आहे. असं असतानाही ज्यापद्धतीने तो आमच्यासोबत वागत, बोलत होता. त्याला तोड नाही. चित्रीकरणादरम्यानही आम्ही प्रत्येक सेटवर असायचो. सेटवरही तो आमच्यासोबत सौजन्यतेने वागायचा. त्याच्यात काहीतरी जादू आहे. सेटवरही तो स्वतः येऊन मिठी मारणार, चौकशी करणार. तो एक अभ्यासू आणि गुणी अभिनेता आहे. त्याचे मराठीबाबत काही प्रश्नही असायचे. बऱ्याचदा आमच्यात याबद्दल चर्चाही व्हायची. त्यामुळे विकी कौशलसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता.”

Web Title: Bollywood movie chhaava writer omkar mahajan talk about writing team and working experience with vicky kaushal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • bollywood movies
  • chhava movie

संबंधित बातम्या

अनिल कपूर पुन्हा बनणार का एक दिवसाचा मुख्यमंत्री? ‘नायक’ सुपरहिट चित्रपटच्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट
1

अनिल कपूर पुन्हा बनणार का एक दिवसाचा मुख्यमंत्री? ‘नायक’ सुपरहिट चित्रपटच्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट

अभिनेता Ashish Vidyarthi आणि त्यांच्या पत्नीचा अपघात; गुवाहाटीमध्ये भरधाव दुचाकीनं दिली धडक, व्हिडीओ शेअर करत दिली अपडेट
2

अभिनेता Ashish Vidyarthi आणि त्यांच्या पत्नीचा अपघात; गुवाहाटीमध्ये भरधाव दुचाकीनं दिली धडक, व्हिडीओ शेअर करत दिली अपडेट

‘ब्यूटी विद ब्रेन! ती केवळ अभिनयात नाही तर विमाने उडवण्यातही पारंगत; ‘ही’ अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे पायलट
3

‘ब्यूटी विद ब्रेन! ती केवळ अभिनयात नाही तर विमाने उडवण्यातही पारंगत; ‘ही’ अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे पायलट

Dhurandhar नंतर रणवीर सिंह आणि अनुष्काची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, कधी होणार चित्रपट री-रिलीज? वाचा सविस्तर…
4

Dhurandhar नंतर रणवीर सिंह आणि अनुष्काची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, कधी होणार चित्रपट री-रिलीज? वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.