फोटो सौजन्य: सोशल मीडिया
२०१६ साली रिलीज झालेला रोमँटिक हिंदी चित्रपट ‘सनम तेरी कसम’ (Sanam Teri Kasam) आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) आणि मावरा हुसेन (Mawra Hocane) यांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारली. दरम्यान, व्हेलेंटाईन विकमध्येच हा चित्रपट थिएटरमध्ये रि- रिलीज करण्यात आला आहे. जेव्हा चित्रपट पहिल्यांदा रिलीज झाला होता. तेव्हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. आता हा फ्लॉप ठरलेला चित्रपट रि- रिलीजमध्ये ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जबरदस्त कमाई करताना दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होताना दिसत आहेत. यातील अनेक चित्रपट जेव्हा पहिल्यांदा रिलीज झाले होते, तेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. परंतु पुन्हा प्रदर्शित झाल्यावर त्यांनी भरपूर कमाई केली. दरम्यान, ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाचंही असंच काहीसं पाहायला मिळत आहे. हा रि-रिलीज झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे.
‘सनम तेरी कसम’ चित्रपट रि- रिलीज होण्यापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आली होती. ७ फेब्रुवारीला अर्थात आज चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्येच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलेली आहे. ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी तब्बल २० हजार तिकिटे विकली गेल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, कोइमोईने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाची एकूण ३९ हजार तिकिटे विकली गेली आहेत. या बाबतीत, हा चित्रपट पहिल्याच दिवशी सुमारे २ कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
अनन्या पांडेला ‘लायगर’ मध्ये का काम करायचं नव्हतं ? वडील चंकी पांडेंनी केला खुलासा
‘सनम तेरी कसम’ आज म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नवीन बॉलीवूड चित्रपट ‘लवयापा’ आणि हिमेश रेशमियाच्या ‘बडास रवी कुमार’ शी स्पर्धा करत आहे. एवढेच नाही तर याच दिवशी ख्रिस्तोफर नोलनचा साय-फाय हॉलिवूड चित्रपट ‘इंटरस्टेलर’ चित्रपटही रि- रिलीज झाला आहे. एका घटनेमुळे स्वतःचं आयुष्य फुकट घालवणारा इंदर आणि एका कर्मठ घरातील सरस्वती उर्फ सरु यांची आगळीवेगळी लव्हस्टोरी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. नशेत असलेल्या इंदरला जखमी अवस्थेत सरू वाचवते आणि ती त्याच्या घरात अडकते. त्यामुळे सरु आणि इंदरविषयी सगळ्यांचा गैरसमज होतो आणि सरुचे वडील तिला घरातून हाकलतात. इंदर सरूचं लग्न लावून द्यायचं ठरवतो पण तो तिच्या प्रेमात पडतो. पण तरीही त्यांच्यात दुरावा येतो. त्यामागचं कारण खूप धक्कादायक असतं. अशी कथा या सिनेमाची होती.
‘सनम तेरी कसम’ हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात लोकप्रिय अशी लव्हस्टोरी असणाऱ्या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात कायम घर केलं. सिनेमातील गाणीही आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. निर्माते आणि दिग्दर्शकांनी ८ वर्षांनी चाहत्यांना चित्रपटाच्या सीक्वेलची गुडन्यूज दिली. यामध्ये हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बाकी स्टारकास्टबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोहम रॉकस्टार एंटरटेन्मेंटच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘सनम तेरी कसम २’ बाबत पोस्ट करण्यात आली होती. चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा सप्टेंबर २०२४ मध्ये करण्यात आली होती.