(फोटो सौजन्य - अकाउंट)
दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ आज १७ एप्रिल रोजी त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. सिद्धार्थने तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. सिद्धार्थने साऊथ इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो अभिनेता असण्यासोबतच निर्माता आणि पटकथा लेखक देखील आहे. त्याचे सगळे चित्रपट सुपरहिट आणि प्रेक्षकांच्या पसंतीस आले आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
सिद्धार्थने आपल्या कारकिर्दीची सुरुवात तमिळ चित्रपटांपासून केली. २००२ मध्ये तो Kannathil Muthamittal या चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला श्रेय देण्यात आले नाही. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तो २००६ मध्ये आमिर खानच्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने सहाय्यक भूमिका साकारली होती. सिद्धार्थने कठोर परिश्रमाने हळूहळू त्याच्या कारकिर्दीत उंची गाठली. आणि अनेक चित्रपट केले. आणि आता अभिनेता करोडोंचा संपत्तीचा मालक आहे.
निकाल येईपर्यंत कुणाल कामराला होणार नाही अटक; मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेला स्थगिती!
सिद्धार्थची एकूण संपत्ती
जीक्यूच्या अहवालानुसार, सिद्धार्थची एकूण संपत्ती सुमारे ७० कोटी रुपये आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, सिद्धार्थ ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करतो. सिद्धार्थकडे तीन आलिशान घरे आहेत. त्याचे हैदराबादमध्ये एक घर, चेन्नईमध्ये एक घर आणि मुंबईत एक घर आहे. सिद्धार्थच्या गाड्यांबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्याकडे रोल्स रॉयस, मर्सिडीज बेंझ आणि ऑडी ए४ आहेत. सिद्धार्थ करोडों संपत्तीचा मालक आहे. हे सगळं त्याच्या कष्ट आणि मेहनतीचं फळ आहे.
अभिनेत्री आदिती राव हैदरीशी केले लग्न
वैयक्तिक आयुष्यात सिद्धार्थने अभिनेत्री अदिती राव हैदरीशी लग्न केले आहे. आदितीसोबतचे हे त्याचे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न मेघना नारायण यांच्याशी झाले होते. पहिले लग्न २००३ ते २००७ पर्यंत चालले. आणि यानंतर हे दोघेही वेगळे झाले. आणि आता अभिनेत्याने २०२४ मध्ये अभिनेत्री अदितीशी लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. अभिनेता त्याच्या दोन्ही लग्नाआधी चर्चेत होता. त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते.
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री झाली आई, दिला गोंडस बाळाला जन्म; जपानी भाषेत ठेवलं नाव
‘रंग दे बसंती’ या चित्रपटा व्यतिरिक्त, सिद्धार्थने ‘चश्मे बदूर’, ‘ब्लड ब्रदर्स’, ‘स्ट्रायकर्स’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले आहे. तसेच अभिनेता शेवटचा ‘टेस्ट’ या चित्रपटात काम करताना दिसला होता. या चित्रपटात तो अर्जुनच्या भूमिकेत दिसला होता. आता तो ‘इंडियन ३’ आणि ‘३ बीएचके’ या येणाऱ्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे.