Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Israel Iran War: ‘माझ्यासोबत, माझी मुलगी देखील…’ युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीत दुबईत अडकली लारा दत्ता

इस्रायल आणि अमेरिकेशी झालेल्या युद्धादरम्यान इराणने दुबईवरही हल्ला केला. दुबईमध्ये अनेक चित्रपट कलाकारांचे घरं देखील आहेत. आता, लारा दत्ताने तेथील परिस्थितीचा आढावा घेत आपला अनुभव शेअर केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 05, 2026 | 11:52 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीत दुबईत अडकली लारा दत्ता
  • परिस्थितीचा आढावा घेत शेअर केला व्हिडीओ
  • लारा दत्ताची मुलं देखील दुबईत
 

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाचा दुबईवरही परिणाम झालेला दिसून आला आहे. दुबई हे जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. सामान्य लोकांसोबतच अनेक भारतीय चित्रपट कलाकारही तिथे राहतात. अभिनेत्री लारा दत्ता देखील तिची मुलगी सायरासोबत दुबईमध्ये आहे. मध्य पूर्व युद्धादरम्यान, तिने दुबईवर आकाशात क्षेपणास्त्रे पाहिली आणि हे तिने इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओमध्ये शेअर केले. अभिनेत्रीचा पती, माजी टेनिसपटू महेश भूपती त्या ठिकाणी नसल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला.

युद्धासारख्या तणावपूर्ण परिस्थितीत दुबईत अडकलेल्या लारा दत्ताने आपला अनुभव सांगताना म्हटले, “गेल्या तीन वर्षांपासून, युएई, दुबई माझ्यासाठी घरासारखे आहे. मी इथे बराच वेळ घालवला आहे. २८ फेब्रुवारी रोजी मी दुबईतील एका स्टुडिओमध्ये शूटिंग करत होते. आम्हाला वरच्या मजल्यावर स्फोटांचे आवाज ऐकू आले. मी स्टुडिओतून बाहेर पडले आणि तेव्हा क्षेपणास्त्रांना हवेतच रोखले जात असल्याचे दिसत होते. अनेक स्फोट झाले होते. मी खोटं बोलणार नाही. ते दिवस खूपच अस्वस्थ करणारे होते.” असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

वर्षा उसगांवकर यांना मोठा धक्का; अभिनेत्रीची लाखोंची फसवणूक, बिल्डर-दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल

आकाशात उडणारी लढाऊ विमाने

लारा दत्ताने सांगितले की तिने स्वतःच्या डोळ्यांनी आकाशात फायटर जेट्स उडताना पाहिले आणि मोठ्या स्फोटांचे आवाजही ऐकले. अभिनेत्री म्हणाली, “मी फक्त इतकंच सांगू इच्छिते की आम्ही सध्या थोडे घाबरलो आहोत आणि ही परिस्थिती खूप भीतीदायक आहे. आकाशात अनेक फायटर जेट्स उडताना दिसत आहेत आणि ‘बूम’चे मोठे आवाज ऐकू येत आहेत. आम्ही ज्या व्हिलामध्ये राहत आहोत तो खूप सुरक्षित आहे, तरीही त्या स्फोटांच्या आवाजामुळे खिडक्या थरथरत आहेत, घर आणि दरवाजेही हलल्यासारखे वाटत आहेत. पण तरीही मला असुरक्षित वाटत नाही. एकदाही नाही.” असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

 

यादरम्यान लाराने युएई सरकारचेही आभार मानले. तिने सांगितले की सरकारने लोकांना मदत केली आणि त्यांना सुरक्षित वाटले. ती म्हणाली, “आमची काळजी घेतली गेली, आम्हाला सुरक्षित वाटले.” तिने पुढे म्हटले की सरकारने प्रत्येकाला त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पर्वा न करता सुरक्षा प्रदान केली आहे. तिने सांगितले की तिचा माळी सकाळी नेहमीप्रमाणे तिच्या लॉनमध्ये रोपांना पाणी घालत होता आणि डिलिव्हरी रायडर्स त्यांचे काम करत होते.

‘जना नायगन’च्या रिलीज डेटबद्दल विजयने सोडले मौन, थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन; म्हणाला ‘तुम्ही मला गप्प करू शकता पण…’

लाराच्या डोळ्यात अश्रू आले

यादरम्यान लारा दत्ता त्या लोकांविषयी बोलताना भावुक झाली, ज्यांच्याकडे आपल्या देशात परत जाण्याचा पर्याय नाही. अभिनेत्री म्हणाली, “ज्या सामान्य लोकांकडे इथून जाण्याचा कोणताही पर्याय नाही आणि जे या देशाची व्यवस्था चालवत आहेत, त्यांचा मला खूप आदर वाटतो. आम्ही सतत फ्लाइट्सची माहिती पाहत आहोत. फारशा फ्लाइट्स नाहीत, पण काही उपलब्ध आहेत. जसे की इतिहाद एअरवेज आणि एमिरेट्स. आम्ही फ्लाइट्स तपासत आहोत आणि मुंबईला परत येण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण मुलं जास्त घाबरली आहेत.”

Web Title: Actress lara dutta talks about war like situation in dubai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Dark Eagle : शत्रूच्या रडारलाही चकवा देणारे अद्भूत शस्त्र; जाणून घ्या काय आहे अमेरिकेचा ‘Dark Eagle’ हायपरसॉनिक प्लॅन
1

Dark Eagle : शत्रूच्या रडारलाही चकवा देणारे अद्भूत शस्त्र; जाणून घ्या काय आहे अमेरिकेचा ‘Dark Eagle’ हायपरसॉनिक प्लॅन

Ishaq Dar: इशाक दार यांनी अमेरिकेत जाऊन इराणच्या अणुकार्यक्रमाची गुपिते केली उघड? पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
2

Ishaq Dar: इशाक दार यांनी अमेरिकेत जाऊन इराणच्या अणुकार्यक्रमाची गुपिते केली उघड? पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

US Politics : ट्रम्प यांना मोठा झटका! इराण युद्धावर संसदेत विरोधी प्रस्ताव मंजूर; पक्षातील खासदारांनीच फिरवली पाठ
3

US Politics : ट्रम्प यांना मोठा झटका! इराण युद्धावर संसदेत विरोधी प्रस्ताव मंजूर; पक्षातील खासदारांनीच फिरवली पाठ

Lagaan Re-Release: आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण! ‘या’ दिवशी पुन्हा थिएटर्समध्ये होणार रिलीज, नवा ट्रेलर आउट
4

Lagaan Re-Release: आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण! ‘या’ दिवशी पुन्हा थिएटर्समध्ये होणार रिलीज, नवा ट्रेलर आउट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.