Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; इंडस्ट्रीत पसरली शोककळा

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मधुमती यांनी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे. बुधवारी सकाळी त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या जाण्याने आता इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 15, 2025 | 04:37 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे निधन
  • वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • हेलनशी अभिनेत्रीची केली तुलना

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मास्टर डान्सर मधुमती आता या जगात नाहीत. बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता विंदू दारा सिंग यांनी सोशल मीडियावर ही दुःखद बातमी शेअर करून या बातमीची पुष्टी केली आहे. ज्यामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. त्यांची अनेकदा बॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर हेलन यांच्यासोबत तुलना केली गेली आहे. या दिग्गज अभिनेतील निरोप देताना चाहत्यांचे अश्रू अनावर झाले आहेत.

विंदू दारा सिंग यांनी शेअर केली दुःखत बातमी
विंदू दारा सिंगत्यांच्या पोस्टमध्ये मधुमती यांना श्रद्धांजली वाहताना विंदू दारा सिंग यांनी लिहिले की, त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर शेकडो कलाकारांसाठी प्रेरणा होत्या. त्यांनी लिहिले की, “ती आमची शिक्षिका, मार्गदर्शक आणि मैत्रीण होती. फक्त माझ्यासाठीच नाही तर अक्षय कुमार, तब्बू आणि तिच्याकडून नृत्य शिकलेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ‘सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिल्यानंतर मधुमती या कायमच्या शांत झाल्या.’

Lagnanantar Hoilach Prem मानिनीचा राग, काव्याचं दु:ख आणि पार्थचं आयुष्य धोक्यात

मधुमती यांच्यासाठी नृत्य हे आयुष्य
नृत्याशिवाय मधुमतीचे आयुष्य अपूर्ण होते. असे म्हटले जाते की नृत्य त्यांच्यासाठी श्वासाइतकेच आवश्यक होते. त्यांचा जन्म ३० मे १९४४ रोजी मुंबईतील एका पारशी कुटुंबात झाला. अभिनेत्रीचे वडील व्यवसायाने न्यायाधीश होते, परंतु मधुमतीला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. लहानपणापासूनच तिने भरतनाट्यम, कथक, मणिपुरी आणि कथकली यासारख्या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. तसेच त्यांच्या जाण्याने आता चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

अभ्यासापेक्षा अभिनेत्रीला संगीत आणि नृत्यात रस होता. नंतर, तिने केवळ चित्रपटांमध्ये नृत्य केले नाही तर अनेक पिढ्यांना नृत्य शिकवले. तिच्या अनेक शिष्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे नाव कमावले आणि आजही ते तिला त्यांचे गुरु म्हणून आठवतात.

सोनाक्षी सिन्हा देणार गुड न्यूज? अभिनेत्रीच्या या कृतीमुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण, व्हिडीओ व्हायरल

हेलनशी अभिनेत्रीची तुलना
मधुमतीची कारकीर्द त्या काळात सुरू झाली जेव्हा हेलन बॉलीवूडमध्ये त्यांच्या नृत्यगीतांसाठी प्रसिद्ध होती. त्यांचे लूक आणि नृत्यशैली आश्चर्यकारकपणे समान होती, ज्यामुळे अनेकदा या दोघींच्या तुलना होऊ लागल्या. मधुमती एका मुलाखतीत म्हणाली, “आम्ही चांगल्या मैत्रिणी होतो. हेलन ही मला सिनिअर आहे. लोक आम्हाला अनेकदा सारखेच मानत असत, पण त्याचा आम्हाला कधीच त्रास होत नव्हता.” दोघांनीही भारतीय चित्रपटसृष्टीत नृत्याला एका नवीन स्तरावर नेले. हेलन या कॅबरे नृत्याचे प्रतीक बनले, तर मधुमती यांनी पारंपारिक आणि चित्रपट नृत्याला एक नवीन प्रतिष्ठा दिली.

वयाच्या १९ व्या वर्षी लग्न
मधुमती यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपट कथेपेक्षा कमी नव्हते. त्यांनी मनोहर दीपकशी लग्न केले, जो अभिनेत्री पेक्षा खूप मोठा होता आणि चार मुलांचे वडील देखील होते. दीपक यांची पहिली पत्नी निधन पावली होती. मधुमतीची आई या नात्याबद्दल नाखूष होती, तरीही त्यांनी त्यांच्या मनाचे ऐकले आणि वयाच्या १९ व्या वर्षी मनोहर दीपकशी लग्न केले. लग्नानंतरही त्यांनी चित्रपट आणि नृत्याच्या जगात लक्ष केंद्रित केले. त्यांनी नृत्याला आपला आत्मा मानले आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत अभिनेत्री विद्यार्थ्यांना शिकवत राहिली.

Web Title: Actress madhumati death helen comparison bollywood dancer life marriage family tribute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Actress
  • entertainment

संबंधित बातम्या

पंकज धीर यांच्या निधनाने कोसळला दुःखाचा डोंगर, चाहत्यांना अश्रू अनावर; जाणून घ्या कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार?
1

पंकज धीर यांच्या निधनाने कोसळला दुःखाचा डोंगर, चाहत्यांना अश्रू अनावर; जाणून घ्या कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार?

महाभारतातील ‘कर्ण’ पंकज धीर यांना प्रत्येक भागासाठी मिळाले एवढेच मानधन, जाणून व्हाल चकीत
2

महाभारतातील ‘कर्ण’ पंकज धीर यांना प्रत्येक भागासाठी मिळाले एवढेच मानधन, जाणून व्हाल चकीत

महाभारतातील ‘कर्ण’ पंकज धीर यांचे कर्करोगामुळे निधन, कॅन्सर होऊ नये म्हणून शरीराची कशी काळजी घ्यावी
3

महाभारतातील ‘कर्ण’ पंकज धीर यांचे कर्करोगामुळे निधन, कॅन्सर होऊ नये म्हणून शरीराची कशी काळजी घ्यावी

पंकज धीर यांचे कर्करोगाने निधन; जाणून घ्या त्यांचे कुटुंब किती मोठे? मुलगा आणि सून लोकप्रिय अभिनेते
4

पंकज धीर यांचे कर्करोगाने निधन; जाणून घ्या त्यांचे कुटुंब किती मोठे? मुलगा आणि सून लोकप्रिय अभिनेते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.