Lagnanantar Hoilach Prem
Lagnanantar Hoilach Prem :- लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालीकेत आजच्या भागात पार्थ कोमात गेल्याच दाखवले आहे आणि आता काव्या कोणत्या अग्निपरीक्षेला सामोरी जाणार हे पाहणं फार महत्वाचं आहे.१३ ऑक्टोबरच्या एपिसोड मध्ये नंदिनी वसुंधराला खूप ऐकवते कारण पार्थ आगीत अडकण्यामागे काव्या आहे असं वाटत. विक्रम सुद्धा नंदिनीची साथ देतो आणि वसुंधराला खरी खोटी सुनावतो, तसेच मानिनीला हि तंबी देतो कि काव्याला काहीही बोलायचं नाही पण मानिनी तिच्या शब्दांवर ठाम असते, तिला असं वाटतंय ती आगीच्या ठिकाणी गेली नसती तर पार्थ आगीत अडकला नसता. विक्रम तिला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करतो पण ती काही ऐकत नसते तिला अजूनही काव्या दोषी आहे असे वाटतं.
काव्याचा बाजूने नंदिनी आणि विक्रम बोलत आहे हे पाहून तिला बरं वाटतं, तिला मानिनीचीहि दया येत असते ती आई आहे आणि म्हणूनच ती त्या काळजीपोटी बोलत आहे. म्हणून ती त्या साठी माफीही मागते, तरीही मानिनी तिला हॉस्पिटल मध्ये येऊ देत नाही विक्रम तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो पण मानिनी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते, मानिनी असं हि सांगते कि हातात जळता कापूर घेऊन मी तासनतास उभी होते तसेच देवाला मी १०१ प्रदक्षिणा घातल्या हे ती विक्रमला आठवण करून देते घरासाठी मी सगळं करते काव्याने आता पर्यंत काय केलं आहे ते सांगा .
महाभारतातील ‘कर्ण’ पंकज धीर यांना प्रत्येक भागासाठी मिळाले एवढेच मानधन
इतक्यात जीवाचा फोन येतो ती त्याला रडतं सांगते कि पार्थ कोमात गेला आहे. सगळेच त्या बातमीने खचून जातात मानिनीला चक्कर येते आणि ती कोसळते. पण ती काव्या ला हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून रोखते, काव्याही पार्थला भेटण्यासाठी व्याकुळ असते पण मानिनी तिला त्याची शपथ घालते कि तू हॉस्पिटल मध्ये जायच नाही . नंदिनीला फार वाईट वाटत असते काव्याबद्दल पण ती माझी सत्वपरीक्षा असं ती सांगते.
मानिनी रडकुंडीला येऊन डॉक्टरांसमोर दया याचना करते कि पार्थ ला वाचवा म्हणून.. डॉक्टर असे सांगतात कि त्याचा मेंदूला ऑक्सिजन पुरवठा होत नाही आहे त्यामुळे तो कोमात गेला आहे. २४ तासात काही सुधारणा नाही झाली तो शुद्धीवर नाही आला तर त्याला वाचवणे कठीण होईल, वसुंधरा मानिनीला धीर देण्याचा नाटक करते जेणेकरून तिला तिच्या जवळ जात येईल.
नंदिनी भांडण विसरून जीवाला धीर देण्याचा प्रयत्न करते, पण जीवाला असं वाटत राहत कि आनंदनिवास त्याचा मुळे गेलं आहे आणि त्याचा मुळेच सर्वाना त्रास होत आहे,.
पंकज धीर यांचे कर्करोगाने निधन
घरात काव्या एकटीच असते आणि ती फार कोलमडून जाते, तिला पार्थबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण आठवतं. ती पार्थ च्या प्रत्येक वस्तूला आणि त्याचे कपडे हातात घेऊन रडत असते. ती ठरवते कि पार्थ ला काही होऊ देणार नाही , त्या साठी ती काहीही करायला तयार होते.