(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या गरोदरपणाच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.ही जोडी लवकरच आई बाबा होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ती आपल्या पती झहीर इक्बालसोबत एका कार्यक्रमात गेली होती. या कार्यक्रमात ती फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांच्या शोमध्ये लाल फुलांनी सजलेली अनारकली ड्रेस घालून आली होती. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. पण या ड्रेसमुळे आणि तिच्या काही हालचालींमुळे प्रेग्नन्सीच्या अफवा पसरल्या.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सोनाक्षी रेड कार्पेटवर फोटो काढताना पोटावर हात ठेवताना दिसत आहे. हे पाहून अनेकांनी तिला गरोदर असल्याचा अंदाज लावला. याआधीही ती अबू धाबीमध्ये एका मशिदीत बूट घालून गेल्याने ती चर्चेत आली होती.आता पुन्हा एकदा तिच्या कृतीमुळे प्रेग्नन्सीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
फोटोग्राफर वीरल भयानी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओखाली एका नेटकऱ्याने ‘प्रेग्नन्सी ग्लो’, एकाने ‘ही गरोदर आहे का’?, ‘बेबी ऑन दी वे’, ‘ओह ती प्रेग्नंट आहे’, ‘ती गरोदर असल्यासारखं वाटतंय’, ‘ती गरोदर आहे’ अशा कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.
सोनाक्षी सिन्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ती गरोदर असण्याची शक्यता वर्तवली आहे. तिच्या वागणुकीवरून आणि रेड कार्पेटवरील हालचालींवरून चाहत्यांनी तर्क लावायला सुरुवात केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत सोनाक्षी किंवा तिच्या पती झहीर इक्बाल यांनी या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सध्या हे फक्त अंदाजच असल्याचं मानलं जात आहे.
यापूर्वी कतरिना आणि कियारा अडवाणी यांच्याबाबतसुद्धा अशाच प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या, आणि नंतर त्या खऱ्या ठरल्या. त्यामुळेच आता सोनाक्षी सिन्हा गरोदर आहे का नाही याचं उत्तर येत्या काळातच ठरेल.