Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अयोध्येनंतर रणबीर कपूरची आणखी एक मोठी गुंतवणूक; पुण्यातील ‘या’ गावात खरेदी केली २५ एकर जमीन

Ranbir Kapoor Pune Land Property : अयोध्येनंतर रणबीर कपूरने आता पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिंपरी गावात २५.७ एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीसाठी त्याने किती कोटी रुपये मोजले आणि व्यवहाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 14, 2026 | 09:06 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

 

  • अयोध्येनंतर रणबीर कपूरची आता पुण्यात मोठी  खरेदी
  • जमिनीसाठी मोजले इतके कोटी
  • मुळशी तालुक्यातील पिंपरी गावात खरेदी केली जागा
Ranbir Kapoor Pune Land: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने अयोध्येनंतर आता महाराष्ट्रातही मोठी रिअल इस्टेट गुंतवणूक केली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिंपरी गावात त्याने तब्बल २५.७ एकर जमीन १६.४२ कोटी रुपयांना खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

मालमत्ता नोंदणी कार्यालयातील कागदपत्रांनुसार, ३० एप्रिल २०२६ रोजी या व्यवहाराची नोंदणी झाली. रणबीरने पिंपरी गावातील लागून असलेले चार भूखंड खरेदी केले आहेत. यापैकी सर्वात मोठा ४३,८०० चौरस मीटरचा भूखंड ७.०७ कोटी रुपयांना, २९,९०० चौरस मीटरचा भूखंड ४.६२ कोटी रुपयांना, २१,४०० चौरस मीटरचा भूखंड ३.३१ कोटी रुपयांना, तर ८,९०० चौरस मीटरचा भूखंड १.३९ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला आहे. ही माहिती CRE Matrix च्या कागदपत्रांमधून समोर आली आहे.

चारही भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ १,०४,००० चौरस मीटर (सुमारे २५.७ एकर) असून त्यांची एकत्रित किंमत १६.४२ कोटी रुपये आहे. या व्यवहारासाठी रणबीर कपूरने ८२.१३ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरल्याची नोंद आहे.

Payal Rohatgi Exclusive Interview: ‘चांगली अभिनेत्री व्हायचं असेल तर…’, बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने दिला ‘हा’ खास मंत्र

यापूर्वी मे २०२६ मध्ये रणबीर कपूरने अयोध्येतील ‘द सरयू’ प्रकल्पात सुमारे ३.३१ कोटी रुपयांचा २,१३४ चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला होता. सरयू नदीच्या काठावर उभारल्या जाणाऱ्या ७५ एकरांच्या या टाऊनशिपमध्ये आधुनिक क्लबहाऊस, ३५ हून अधिक लाइफस्टाइल सुविधा आणि ‘द लीला’द्वारे संचालित आलिशान शाकाहारी हॉटेल उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.

केवळ भाषांतर नाही तर…; १४ भाषांमध्ये डब होणारी Heeramandi ठरली पहिली भारतीय सिरीज! ४३ देशांमध्ये ‘टॉप १०’ मध्ये स्थान

रणबीर कपूरच्या या व्यवहारामुळे बॉलिवूड कलाकारांचा मुंबईबाहेरील रिअल इस्टेटमध्ये वाढता कल पुन्हा अधोरेखित झाला आहे. अलिबाग, लोणावळा, पुणे आणि गोवा यांसारख्या ठिकाणी अनेक सेलिब्रिटी शेतजमीन, हॉलिडे होम्स आणि प्रीमियम निवासी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करत आहेत. अमिताभ बच्चन, कार्तिक आर्यन, क्रिती सॅनॉन, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या सेलिब्रिटींनीही विविध भागांत मालमत्ता खरेदी केली आहे.

दरम्यान, रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून ‘रामायण : भाग १’ दिवाळी २०२६, तर ‘रामायण : भाग २’ दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: After ayodhya ranbir kapoor buys 25 acres of land in pune 1642 crore deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • property deal
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
1

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा
2

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा

Mouni Roy Fashion : मौनी रॉयचे ५ लुक्स ठरले फॅशन गोल्स; ‘द्रेप्ड देवी’पासून ‘रिस्क-टेकर’पर्यंत पाहा फोटो
3

Mouni Roy Fashion : मौनी रॉयचे ५ लुक्स ठरले फॅशन गोल्स; ‘द्रेप्ड देवी’पासून ‘रिस्क-टेकर’पर्यंत पाहा फोटो

Abhijeet Sawant: जुनं घर, गणपती बाप्पा अन् आठवणींचा खजिना; अभिजीत सावंतने शेअर केला खास Video
4

Abhijeet Sawant: जुनं घर, गणपती बाप्पा अन् आठवणींचा खजिना; अभिजीत सावंतने शेअर केला खास Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.