Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Payal Rohatgi Exclusive Interview: ‘चांगली अभिनेत्री व्हायचं असेल तर…’, बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने दिला ‘हा’ खास मंत्र

Payal Rohatgi: बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने 'नवराष्ट्र'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अभिनय, संगीत आणि व्हॉईस मॉड्युलेशनबाबत मनमोकळेपणाने भाष्य केलं. उत्तम अभिनेत्री बनण्यासाठी संगीताचं महत्त्वही तिने स्पष्ट केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 13, 2026 | 03:57 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने दिला खास मंत्र
  • उत्तम अभिनेत्री होण्यासाठी काय करावे?
  • अभिनयासोबतच संगीता कडे का वळली अभिनेत्री?
 

Payal Rohatgi Exclusive Interview:  बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगीने नुकत्याच ‘नवराष्ट्र’ला दिलेल्या खास मुलाखतीत अभिनय, संगीत आणि तिच्या भविष्यातील योजना याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. उत्तम अभिनेत्री होण्यासाठी केवळ भावना व्यक्त करणं पुरेसं नसून, आवाजातील चढ-उतार अर्थात व्हॉईस मॉड्युलेशनही तितकंच महत्त्वाचं असल्याचं तिने यावेळी सांगितलं.

अभिनयानंतर संगीताची आवड कशी निर्माण झाली? यावर पायल म्हणाली, “प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे येतात. आता मला काहीतरी नवीन शिकायचं होतं. माझ्या चित्रपटांमधील गाणी श्रेया घोषाल, कैलाश खेर यांसारख्या गायकांनी गायली होती. त्यामुळे मला गाणं शिकण्याची गरज कधी वाटली नाही. त्या काळात मी अभिनय आणि डान्सवरच अधिक लक्ष दिलं.”

संगीत शिकण्यामागचं कारण सांगताना ती म्हणाली, “आता मला आशयघन आणि महिलाप्रधान भूमिका करायच्या आहेत. अभिनयात केवळ भावना पुरेशा नसतात, तर आवाजातील चढ-उतारही तितकेच महत्त्वाचे असतात. इमोशन्ससोबत योग्य व्हॉईस मॉड्युलेशन असेल, तर तुम्ही अधिक प्रभावी अभिनेत्री बनू शकता. म्हणूनच मी संगीत शिकण्याचा निर्णय घेतला.”


Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख

पायल सध्या गायक कैलाश खेर यांच्या अकॅडमीत संगीताचे धडे घेत आहे. याबद्दल ती म्हणाली, कैलास खेर यांची अकॅडमी माझ्या घराच्या अगदी जवळ आहे. म्हणून मी ही अकॅडमी निवडली. कैलासजींसोबत माझे जुने नाते आहे, कारण माझे पहिले आयटम साँग (‘ओ सिकंदर’ – चित्रपट: कॉर्पोरेट) त्यांनीच गायले होते. अकॅडमीमध्ये पहिल्या दिवशी माझी आवाजाची चाचणी झाली. मी तिथे हनुमान चालीसा गायली, कारण मी ती रोज वाचते आणि मला तेच नीट गाता येत होते

सध्या ती सारेगम, अलंकार, पलटे आणि राग यांचे प्राथमिक धडे शिकत आहे. याशिवाय आवाज अधिक मृदू आणि प्रभावी करण्यासाठी ती स्वतंत्रपणे सरावही करत आहे. “गायक होण्यासाठी आवाजाची काळजी घेणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. त्यामुळे मी फोनवर कमी बोलते आणि शक्य तितका व्हॉट्सॲपचा वापर करते,” असंही तिने सांगितलं.

दीपिका पदुकोणबाबतच्या वक्तव्यावर मुझम्मिल इब्राहिमचं स्पष्टीकरण; म्हणाला, ‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला’

भविष्यात व्यावसायिक गायिका होण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर पायल म्हणाली, “अभिनयासोबत गायनाची संधी मिळाली तर मला नक्की आवडेल. सध्या मी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची गाणी गात सराव करत आहे. संगीतामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल झाला असून, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. संगीताने माझ्या आयुष्यात शांतता आणि गोडवा आणला आहे.”

Web Title: Payal rohatgi shares her mantra for becoming a better actress in an exclusive interview with navarashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • special interview

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.