Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वप्नसुंदरी’साठी हटके प्रमोशन! ‘कॅन वी अटेंड युअर वेडिंग?’ म्हणत चाहत्यांच्या लग्नात पोहोचले भूषण प्रधान-सायली पाटील

swapnasundari movie Promotion: 'स्वप्नसुंदरी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री सायली पाटील यांनी 'Can We Attend Your Wedding?' या अनोख्या मोहिमेद्वारे चाहत्यांच्या लग्नाला उपस्थित राहत त्यांना सरप्राईज दिलं. या हटके प्रमोशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 13, 2026 | 04:12 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

swapnasundari movie Promotion : रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’ सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी राबवलेलं ‘Can We Attend Your Wedding?’ हे हटके कॅम्पेन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं आहे. या मोहिमेअंतर्गत अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री सायली पाटील यांनी थेट चाहत्यांच्या लग्नाला उपस्थित राहून नवदांपत्यांना सुखद धक्का दिला.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक नवदांपत्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भूषण व सायली यांना आपल्या लग्नाचं निमंत्रण दिलं. त्यापैकी काही निवडक लग्नसोहळ्यांना कलाकारांनी उपस्थित राहत नवविवाहितांच्या आनंदात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

या अनपेक्षित भेटीमुळे लग्नसोहळ्यातील आनंद आणखी द्विगुणित झाला. नवदांपत्यांसोबत फोटो, सेल्फी, गप्पा, शुभेच्छा आणि धमाल मस्ती करत भूषण आणि सायली यांनी प्रत्येक कुटुंबासोबत अविस्मरणीय क्षण अनुभवले. या भेटींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांकडून या अनोख्या प्रमोशनचं कौतुक होत आहे.

Dil Deewana Ho Gaya Movie : ‘दिल दिवाना हो गया’चा Trailer रिलीज; रोमँस आणि संगीताचा रंगतदार प्रवास 31 जुलैपासून

याबाबत बोलताना भूषण प्रधान आणि सायली पाटील म्हणाले, “या कॅम्पेनला मिळालेलं प्रेम आमच्यासाठी खूप खास आहे. प्रत्येक लग्नात उपस्थित राहणं शक्य नसल्याची खंत आहे. मात्र ज्या विवाहसोहळ्यांना आम्ही गेलो, तिथे आम्हाला कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम मिळालं. नवदांपत्यांच्या आनंदात सहभागी होत आम्हीही मनापासून आनंद लुटला. आता प्रेक्षकांनी ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपट पाहून राघवला त्याची खरी ‘स्वप्नसुंदरी’ मिळते का, हे २४ जुलैपासून चित्रपटगृहात अनुभवावं.”

सतीश महादेव गेजगे निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित ‘स्वप्नसुंदरी’ हा चित्रपट रोमँस, कौटुंबिक नाट्य, विनोद आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली कथा घेऊन २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Payal Rohatgi Exclusive Interview: ‘चांगली अभिनेत्री व्हायचं असेल तर…’, बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने दिला ‘हा’ खास मंत्र

Web Title: Unique promotion for swapnasundari bhushan pradhan and sayali patil surprise fans by attending their weddings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Bhushan Pradhan
  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड
1

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच
2

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर
3

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर

Marathi Movie: प्रेम, लग्न आणि नात्यांमधील ट्विस्ट! पूजा सावंत-अभिजीत खांडकेकरच्या ‘लग्न आणि बरंच काही’चा ट्रेलर प्रदर्शित
4

Marathi Movie: प्रेम, लग्न आणि नात्यांमधील ट्विस्ट! पूजा सावंत-अभिजीत खांडकेकरच्या ‘लग्न आणि बरंच काही’चा ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.