Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हक’च्या यशानंतर Yami gautam धरचं मन जिंकणारं वक्तव्य, जाणून घ्या काय म्हणाली अभिनेत्री

हक़च्या माध्यमातून अभिनेत्रीने भारतीय सिनेमातील सर्वोत्तम कलाकारांमध्ये आपली जागा पक्की केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 29, 2025 | 04:08 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

या वर्षी यामी गौतमचा अभिनय खूपच दमदार ठरला. तिने एका असा चित्रपट दिला, ज्यात तिचा अभिनय आणि चित्रपटाची कथा दोन्ही लोकांच्या मनावर घर करून राहिल्या. समीक्षकांनी तिचं कौतुक केलं आणि प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप भावला. यामुळं तिने भारतीय सिनेमातील सर्वोत्तम कलाकारांमध्ये आपली जागा मजबूत केली.

चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादांवर अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत यामी म्हणाली, “हक़ हा माझ्या करिअरमधील सर्वाधिक कौतुक मिळालेल्या चित्रपटांपैकी एक आहे आणि ज्यांनीही हा चित्रपट पाहिला आहे, त्यांनी सांगितलं की तो त्यांना मनापासून स्पर्श करून गेला. मला खूप वैयक्तिक आणि भावनिक असे अनेक संदेश मिळाले आहेत. मला मनापासून वाटतं की याचं श्रेय सगळ्यांनाच जातं. ही कधीच एका व्यक्तीची गोष्ट नसते, ना एखाद्याचा एकट्याचा प्रवास किंवा यश असतं, आणि मी ह्याच विचाराने काम करते. त्यामुळे मी कधीच असं म्हणू शकत नाही की हा फक्त माझा चित्रपट होता किंवा हे फक्त माझं यश होतं.”

ही साधेपणाची भावना हक़ च्या आत्म्यालाच प्रतिबिंबित करते. असा चित्रपट जो लक्ष वेधण्यासाठी गोंगाट करत नाही, तर शांतपणे खोल ठसा उमटवतो. समीक्षकांनी यामीच्या संयमित अभिनयाची, भावनांची सखोल समज आणि आतून साकारलेल्या अभिनयाची विशेष प्रशंसा केली आहे, आणि याला या वर्षातील सर्वात मजबूत महिला-केंद्रित भूमिकांपैकी एक मानलं आहे. केवळ कथा किंवा दिग्दर्शनासाठीच नव्हे, तर ज्या प्रामाणिकपणे आणि विश्वासाने यामीने आपली भूमिका साकारली आहे, त्यासाठीही भरभरून कौतुक झालं आहे.

आपल्या भूमिकेशी असलेल्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला या विषयावर खूप विश्वास होता. या पात्राबद्दल माझी जी समज होती, तिच्या भावना, तिचा प्रवास कसा असू शकतो, हे सगळं मी मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटात कल्पना आणि वास्तव यांचा संगम असला, तरी तो प्रत्येकासाठी सोपा आणि आपलासा वाटावा हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, जेणेकरून तो पाहणारा कुठलाही माणूस तो कुठल्याही जेंडर, समुदाय, जात किंवा पार्श्वभूमीचा असो,स्वतःला त्याच्याशी जोडू शकेल.”

मुखवट्याच्या मागची रहस्यं, 4 खून, शून्य पुरावे…”; ‘केस नं. ७३’ चित्रपटाचे मोशन पोस्टर चर्चेत

हा विश्वास पडद्यावर स्पष्टपणे दिसून येतो. हक़मध्ये यामी कथा पुढे जाऊ देते आणि कधीही तिच्यावर हावी होत नाही. ती संवादांइतकाच शांततेवरही विश्वास ठेवते. चित्रपटात तिचे अनेक प्रभावी संवाद आणि मोनोलॉग्स आहेत, पण काही असे भावनिक प्रसंगही आहेत जिथे तिचे डोळेच सगळं काही सांगून जातात. गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रभावी भूमिका साकारल्यानंतर हक़ हा तिच्या कलात्मक प्रवासातील एक असा टप्पा वाटतो, जो पूर्णत्वाला गेलेला आहे. आत्मविश्वासाने भरलेला, बेधडक आणि कथाकथनाशी खोलवर जोडलेला. जसं-जसं 2025 पुढे सरकत आहे, तसं हे अधिकाधिक स्पष्ट होत चाललं आहे की जेव्हा लक्षात राहणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या आणि भावनिक करणाऱ्या अभिनयाची गोष्ट येते, तेव्हा त्या अर्थाने हे वर्ष यामी गौतम धरचं आहे.

अरे! हे काय घडलं? ‘हा’ प्रसिद्ध साउथ अभिनेता एअरपोर्टवर घसरून पडला, Video Viral

Web Title: After the success of haqq yami gautam dhar delivers a heartwarming statement find out what the actress said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • bollywood movies
  • Yami Gautam

संबंधित बातम्या

‘Dhurandhar’ च्या निर्मात्यांनी कमावला बक्कळ पैसा! बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच ‘इतक्या’ कोटींचा अकडा पार
1

‘Dhurandhar’ च्या निर्मात्यांनी कमावला बक्कळ पैसा! बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच ‘इतक्या’ कोटींचा अकडा पार

”तो त्याचे आयुष्य…”, “अर्शद वारसीने Akshaye Khannaच्या स्वभावाचा केला खुलासा; म्हणाला,”त्याला कोणाचीही काळजी”
2

”तो त्याचे आयुष्य…”, “अर्शद वारसीने Akshaye Khannaच्या स्वभावाचा केला खुलासा; म्हणाला,”त्याला कोणाचीही काळजी”

बॉलीवूडचा पर्दाफाश : ए-लिस्टर स्टार्सची फी आणि दिखावटी कास्टिंग उघडकीस, Imran Khanने केली पोलखोल
3

बॉलीवूडचा पर्दाफाश : ए-लिस्टर स्टार्सची फी आणि दिखावटी कास्टिंग उघडकीस, Imran Khanने केली पोलखोल

Battle Of Galwan Cast Fees: सलमानचे मानधन सैराटच्या Box Office कलेक्शनहुनही जास्त! इतर कलाकारांनीही घेतली मोठी रक्कम
4

Battle Of Galwan Cast Fees: सलमानचे मानधन सैराटच्या Box Office कलेक्शनहुनही जास्त! इतर कलाकारांनीही घेतली मोठी रक्कम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.