(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड इंडस्ट्रीचा ॲक्शन स्टार अक्षय कुमार त्याच्या दमदार अभिनयासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. यासोबतच तो असे काही काम करतो की त्याची खूप प्रशंसा होते. आता अक्षय कुमारने पुन्हा असे काम केले आहे ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. यावेळी, अभिनेत्याने दिवाळीपूर्वी अयोध्येसाठी केलेले काम कौतुकास्पद आहे. वास्तविक, अक्षय कुमारने एक कोटी देण्याचे ठरवले आहे. यानंतर त्याचे खूप कौतुक होत आहे. जाणून घेऊया कोणत्या कारणासाठी अभिनेत्याने हे दान दिले आहे.
अक्षय कुमारने एक कोटी रुपयांची दिली देणगी
अक्षय कुमारने अयोध्येतील माकडांना अन्न पुरवणाऱ्या ट्रस्टला देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. जगतगुरु स्वामी राघवाचार्य जी महाराज यांच्या नेतृत्वाखालील अंजनेय सेवा ट्रस्ट यासाठी पुढाकार घेत आहे. अक्षय कुमारने या ट्रस्टच्या पुढाकारात सामील होऊन 1 कोटी रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरुन अयोध्येत दररोज जास्तीत जास्त माकडांना खाऊ घालता येईल.
हे देखील वाचा – धन्य तो राजा अन् धन्य ते मावळे; दिवाळीत लहान मुलं किल्ला का तयार करतात जाणून घ्या!
अंजनेय सेवा ट्रस्टने अक्षय कुमारचे केले कौतुक
अक्षय कुमारच्या देणगीबद्दल बोलताना अंजनेय सेवा ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त प्रिया गुप्ता म्हणाल्या, ‘मी अक्षय कुमारला नेहमीच एक अतिशय दयाळू आणि उदार व्यक्ती म्हणून ओळखते. त्याच्या टीम आणि स्टाफ व्यतिरिक्त, तो नेहमी त्याच्या सहकलाकारांना कुटुंबाप्रमाणे वागवतो. त्यांनी केवळ 1 कोटी रुपयांची देणगीच दिली नाही तर ही सेवा त्यांचे आई-वडील आणि सासरच्या लोकांनाही समर्पित केली आहे.
अक्षय कुमारला भारताचा जागरूक नागरिक म्हटले जाते
ते पुढे म्हणाले, ‘अक्षय कुमार हा केवळ एक उदार दाता नाही तर भारताचा एक जागरूक नागरिक देखील आहे. त्यांना अयोध्या आणि शहरातील नागरिकांची काळजी होती आणि माकडांना खायला घालताना कोणत्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. सोबतच हे उदात्त कार्य करत असताना अयोध्येच्या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारे अस्वच्छता होता कामा नये’. असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा – ‘मॅच फिक्सिंग’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला! विनीत कुमार सिंगच्या कामगिरीबद्दल चाहत्यांना वाटले कौतुक!
अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
अक्षय कुमारच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर ‘वेलकम टू द जंगल’ हा सिनेमा या वर्षी डिसेंबरमध्ये सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय अक्षय कुमारकडे ‘हेरा फेरी 3’, ‘जॉली एलएलबी 4’, ‘हाऊसफुल 5’ आणि ‘भूत बंगला’ यासह अनेक चित्रपट अभिनेत्याचे पाइपलायनमध्ये आहेत. जे लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. तसेच अभिनेता येत्या दिवाळी प्रदर्शित होणार ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात देखील झळकणार आहे.