दिवाळीची तयारी सर्वत्र जोरदार सुरु आहे. आणि अश्यातच प्रत्येकाच्या घरात या सणाचा उत्साह साजरा केला जात आहे. फराळ, कंदील, रांगोळ्या आणि किल्ल्यांची देखील तयारी सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लहान मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास कळवा म्हणून हे किल्ले बांधले जातात. किल्ला हे शौर्याचे आणि ध्येयाचं प्रतिक मानलं जातं .दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेच बिज मनामध्ये रुजवण्यांच काम होतं. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगुळाही यामुळे मिळत असे. ही परंपरा आताची पिढी देखील आगदी मनापासून जमत आहे.
दिवाळीत लहान मुलं किल्ला का तयार करतात जाणून घ्या (फोटो सौजन्य- अभिषेक ढावण, बारामती)
आपण बऱ्याच वेळा गड किल्ले सर करतो. गड किल्ले हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आत्ता जे किल्ले पाहतो ते गड वा त्यातील वास्तूंचे अवशेष आहेत. पण ज्यावेळेस ते बांधले गेले त्यावेळी ती एक डौलदार वास्तू असते. हा किल्ला बारामतीतील अभिषेक ढावण यांनी तयार केला आहे
दिवाळीला किल्ला बनवणे ही प्रथा खूप जुनी आहे. ज्यामुळे लहान मुलांना किल्ल्यांचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्टी त्याच्या मनात नेहमीच घर करून राहील.
किल्ल्यावर दरबार, बाजार, मंदिर, नागमोडी वळण असणारा महा दरवाजा, तबेला, इत्यादी असे वास्तू तयार केल्या जातात, त्यामुळे ते हुबेहूब खऱ्या किल्ल्यांसारखे दिसून येते.
याचदरम्यान हे सगळे आज ही जर सुखरूप असते तर ते कसे दिसले असते याची काल्पनिक प्रतिकृती किल्ल्यांद्वारे तयार करण्यात येते. ही फक्त एक कल्पना आहे पण या मागची भावना आपल्या गड किल्ल्यांच्या वास्तूंचे वैभव समोर आणणे आहे.
या किल्ल्यांचे जतन करणे आणि ते स्वच्छ ठेवणे हे आजच्या आणि पुढच्या पिढीची जबाबदारी आहे. त्यामुळे या दरवर्षी दिवाळीला असे सुरेख किल्ले लहान मुलं तयार करतात.