Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साऊथच्या ‘पुष्पा’ने केली ‘धुरंधर’ची वाहवाह! अल्लू अर्जुन अक्षय खन्नाचा झाला चाहता; दिग्दर्शकाचेही केले कौतुक

"धुरंधर" हा चित्रपट केवळ सामान्य प्रेक्षकांकडूनच नाही तर मोठ्या कलाकारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने "धुरंधर" पाहून त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 12, 2025 | 03:45 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • साऊथच्या ‘पुष्पा’ने केली ‘धुरंधर’ची वाहवाह
  • अल्लू अर्जुन अक्षय खन्नाचा झाला चाहता
  • ‘धुरंधर’ने सात दिवसांत केली २०० कोटींची कमाई
 

रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त स्टारर “धुरंधर” हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत करताना दिसत आहे. सेलिब्रिटींकडूनही त्याचे कौतुक होत आहे. अक्षय कुमार, हृतिक रोशन आणि विकी कौशल सारख्या कलाकारांनंतर, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने आता “धुरंधर” चे कौतुक केले आहे. अर्जुनने रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांचे आणि क्रूचे कौतुक केले आहे. आता साऊथ अभिनेता या चित्रपटाबद्दल काय म्हणाला जाणून घेऊयात.

Street Fighter Teaser: ‘स्ट्रीट फाइटर’ चित्रपटाचा टीझर आउट, Vidyut Jammwalचा जबरदस्त लुक होतोय व्हायरल

चित्रपटातील संपूर्ण कलाकारांचे केले कौतुक

‘धुरंधर’ पाहिल्यानंतर, अल्लू अर्जुनने ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट शेअर करत चित्रपटाला उत्कृष्ट म्हणाला. अल्लू अर्जुनने लिहिले, “मी नुकताच धुरंधर पाहिला. उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट तांत्रिक पैलू आणि उत्कृष्ट संगीताने भरलेला एक उत्तम चित्रपट. माझा भाऊ रणवीर सिंगचा दमदार अभिनय; तो त्याच्या बहुमुखी प्रतिभेने लक्ष वेधत आहे. अक्षय खन्नाचे करिष्माई व्यक्तिमत्व आणि संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि इतर सर्व कलाकारांचे उत्कृष्ट अभिनय. सारा अर्जुनचा अभिनयही सुंदर आहे.” असे म्हणून अभिनेत्याने सगळ्यांचे कौतुक केले आहे.

 

Just watched #Dhurandhar. A brilliantly made film filled with fine performances, the finest technical aspects, and amazing soundtracks. Magnetic presence by my brother @RanveerOfficial, he rocked the show with his versatility.
Charismatic aura by #AkshayeKhanna ji, and the…
— Allu Arjun (@alluarjun) December 12, 2025

आदित्य धरने दाखवला आपला पराक्रम

अल्लू अर्जुनने केवळ चित्रपटातील कलाकारांचेच नव्हे तर सर्व क्रू आणि तंत्रज्ञांचेही कौतुक केले. त्याच्या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिले, “संपूर्ण टीमचे अभिनंदन. सर्व तंत्रज्ञ, कलाकार, क्रू, ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओचे अभिनंदन.” शेवटी, चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांचे कौतुक करताना अल्लू अर्जुनने लिहिले, “या चित्रपटाचे कर्णधार, प्रतिभावान आणि हुशार चित्रपट निर्माते आदित्य धर, तुम्ही एक कुशल चित्रपट निर्माते म्हणून तुमची खरी प्रतिभा दाखवली आहे.” लोकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन करताना, अल्लू अर्जुनने शेवटी म्हटले, “मला हा चित्रपट खूप आवडला. जा आणि त्याचा आनंद घ्या.”

‘तुमच्या अभिनयाने अनेक पिढ्यांना केले मोहीत..,’ पंतप्रधान मोदींनी रजनीकांत यांना दिल्या शुभेच्छा; केले तोंडभरून कौतुक

‘धुरंधर’ने सात दिवसांत २०० कोटी रुपयांचा आकडा ओलांडला

‘धुरंधर’ने सात दिवसांत २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपला वेग कायम ठेवला आहे. या स्पाय-थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंग व्यतिरिक्त, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि सारा अर्जुन हे प्रमुख भूमिकेत आहेत.

Web Title: Allu arjun review dhurandhar he praised ranveer singh akshaye khanna with whole cast and crew of the film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • Akshaye Khanna
  • Allu Arjun
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

‘मी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडेन… पण, मी स्वतःला बदलणार नाही’, असं ‘का’ म्हणाला होता ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्ना?
1

‘मी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडेन… पण, मी स्वतःला बदलणार नाही’, असं ‘का’ म्हणाला होता ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्ना?

Dhurandar Movie: पाकिस्तानचा अंडरवर्ल्ड म्हणून ओळखला जाणारा ल्यारी! रेहमान डकैतचे साम्राज्य
2

Dhurandar Movie: पाकिस्तानचा अंडरवर्ल्ड म्हणून ओळखला जाणारा ल्यारी! रेहमान डकैतचे साम्राज्य

Dhurandhar बॉक्स ऑफिसवर सुस्साट! सातव्या दिवशीही कोटींचा गल्ला, Worldwild Collection ‘ही’ कमाल
3

Dhurandhar बॉक्स ऑफिसवर सुस्साट! सातव्या दिवशीही कोटींचा गल्ला, Worldwild Collection ‘ही’ कमाल

Dhurandhar मधील ‘या’ एकमेव अभिनेत्याकडे आहे 4.5 कोटींची आलिशान कार
4

Dhurandhar मधील ‘या’ एकमेव अभिनेत्याकडे आहे 4.5 कोटींची आलिशान कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.