(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सर्वात देखणा अभिनेता वरुण धवनचे चाहते त्याच्या बेबी जॉन चित्रपटाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. वरुण नवा डॅशिंग लुक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. या चित्रपटातील सलमानचा कॅमिओही चर्चेचा विषय ठरला होता. अखेर, आता बेबी जॉनने 25 डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर प्रवेश केला आहे. चित्रपटातील वामिका गब्बी आणि कीर्ती सुरेश यांच्या अभिनयानेही खळबळ उडवून दिली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटगृहे जबरदस्त भरली होती आणि सुट्टीचा चांगला फायदा चित्रपटाला मिळाला. लोकांना चित्रपट कसा आवडला ते जाणून घेऊयात.
सलमानच्या कॅमिओचे कौतुक होत आहे
खूप दिवसांनी ॲटलीचे आभार मानत एकाने लिहिले, ‘सलमानच्या कॅमिओ घेतल्याबद्दल मी आभारी आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, “सलमान खानसारख्या मेगास्टारला मोठ्या पडद्यावर कसे सादर करायचे हे एटलीला खरेच माहीत आहे.’ तर तिसऱ्याने लिहिले, ‘किती अप्रतिम कॅमिओ कामगिरी आहे’. असे लिहून चाहत्यांना सलमान खानचा कॅमिओ प्रचंड आवडलेला दिसत आहे. प्रेक्षक या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद देखील देत आहेत.
बेबी जॉन ब्लॉकबस्टर चित्रपट सांगितले
एकाने लिहिले की, ‘सलमान खानची एन्ट्री अप्रतिम आहे. गुड जॉब, बेबी जॉन हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.’ तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, वरुणच्या अभिनयाने चकित करून टाकले.’ असे प्रतिसाद प्रेक्षकांचे समोर येत आहे.
After a Long time someone has introduced #Salmankhan Bhai in goat mode🔥💥
Thank You #Atlee Anna for This 🙏🙌
&Waiting For Salman × Atlee epic Collaboration 🔥🔥#BabyJohnpic.twitter.com/eyABalPz2I
— Superman🦸♂️ (@dh88057) December 24, 2024
क्लायमॅक्सने चमत्कार केला
एकाने सांगितले की, ‘चित्रपटामधील क्लायमॅक्स खूप चांगला आहे, सर्वात चांगला भाग म्हणजे चित्रपटाचा क्लायमॅक्स ज्यामध्ये वामिका गब्बीने तिच्या भूमिकेने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.’
‘बेबी जॉन’चे इतर कलाकार आणि त्यांची पात्रे
कीर्ती सुरेश ‘बेबी जॉन’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यामध्ये तिने वरुणची पत्नी मीरा रेड्डी वर्माची भूमिका साकारली आहे. जॅकी श्रॉफ खलनायक बब्बर शेर आणि शीबा चड्डा वरुणच्या ऑन-स्क्रीन आईच्या भूमिकेत आहे. वरुणने अलीकडेच स्पष्ट केले की ‘बेबी जॉन’ हा दलापथी विजय स्टारर तमिळ चित्रपट ‘थेरी’चा रिमेक नाही. त्याने पुष्टी केली की हे मोठ्या बदलांसह एक रुपांतर आहे.
Allu Arjun: चौकशीदरम्यान अल्लू अर्जुन पोलिसांसमोर का झाला भावूक? हे मोठे रहस्य आले समोर!
‘बेबी जॉन’ घेणार 15 कोटींची ओपनिंग?
PVR आयनॉक्स सारख्या शीर्ष सिनेमा साखळींमध्ये या चित्रपटाची 75 हजाराहून अधिक तिकिटे विकली जाण्याची अपेक्षा आहे आणि पहिल्या दिवशी 15 कोटी रुपये कमावण्याचे उद्दिष्ट आहे. तिकिटांचा आकडा 80 हजारांपर्यंत पोहोचण्याचीही शक्यता आहे. हे लक्ष्य गाठल्यास चित्रपटाची दमदार सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. तथापि, कोणतीही कमतरता त्याच्या प्रारंभावर परिणाम करू शकते.