(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘पुष्पा 2’ चा प्रीमियर शो 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटर, हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनेता अल्लू अर्जुनने अचानक थिएटरला भेट दिल्याने प्रचंड गर्दी जमली आणि गोंधळ निर्माण झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. त्याचवेळी त्यांचा आठ वर्षांचा मुलगा सध्या गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. या सगळ्या प्रकरणेनंतर अभिनेता चांगलाच अडचणीत अडकला आहे. त्यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.
अल्लू अर्जुनची चौकशी करण्यात आली
अल्लू अर्जुनला गेल्या शुक्रवारी या प्रकरणी अटक करण्यात आली होती, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. अल्लूची भेट विनापरवानगी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक थिएटरमध्ये पोहोचले होते, त्यामुळे तेथे गोंधळ उडाला होता. याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर अल्लू अर्जुनला मंगळवारी (24 डिसेंबर) पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
यामुळे अभिनेता झाला भावूक
अलीकडील वृत्तानुसार अल्लूची सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली. संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आला, जो पाहून तो भावूक झाला. एका सूत्रानुसार, “व्हिडिओ पाहून अल्लू अर्जुन भावूक झाला, ज्यामध्ये श्रीतेज आणि रेवती जखमी झाल्याचे दिसले आहे.” हा व्हिडीओ पाहून अभिनेता भावुक झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी विचारले प्रश्न
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी अल्लूची थेट चौकशी केली. सूत्रानुसार, त्याला विचारण्यात आले की, ‘पोलिसांनी प्रीमियर शोला येण्याची परवानगी दिली नव्हती हे तुम्हाला माहीत आहे का?’, ‘पोलिसांनी परवानगी दिली नसतानाही ती योजना पुढे नेण्याचा निर्णय कोणी घेतला? ‘, ‘बाहेर चेंगराचेंगरी झाल्याची माहिती तुम्हाला कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने दिली होती का?’ ‘तुम्हाला त्या बाईच्या मृत्यूबद्दल कधी कळलं?’ असे प्रश्न पोलिसांनी अभिनेत्याला केले आहे.
ऐश्वर्या रायने‘जोधा अकबर’मध्ये परिधान केलेला लेहेंगा ऑस्करमध्ये, नेमकं कारण काय ?
‘पुष्पा 2’ बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत आहे
पुष्पा 2 बद्दल बोलायचे तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. तसेच, भारतात या चित्रपटाने 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. हिंदी भाषेतही या चित्रपटाने 700 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, चित्रपटाचे एकूण कलेक्शन 1089.85 कोटी रुपये झाले आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहे.