सोमवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन बहिणीसह देश सोडला. यानंतर शेख हसीना यांच्या घर गणभवनात लोकांचा जमाव पोहोचला. जिथे त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड करून लुटमार केली. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. इतकेच नाही तर बांगलादेशातही हिंदूंवर हल्ल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत, त्यावर अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे. सोनू सूदने कोरोनाच्या काळात लाखो लोकांना मदतीचा हात पुढे केला होता. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर लोक पुन्हा एकदा अभिनेत्याला मदतीची विनंती करत आहेत. अश्यातच अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
सोनू सूदने शेअर केली पोस्ट
बांगलादेशातील घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सोनू सूदने X अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लिहिले आहे – ‘बांगलादेशातून आमच्या सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून त्यांना येथे चांगले जीवन मिळू शकेल. सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या सरकारची ही जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांचीही आहे.’ असे या अभिनेत्याने लिहिले आहे. जे पाहून चाहत्यांना त्याच्या आणखी गर्व वाटू लागला आहे.
We should do our best to bring back all our fellow Indians from Bangladesh, so they get a good life here. This is not just the responsibility of our Government which is doing its best but also all of us.
Jai Hind 🇮🇳 https://t.co/OuL550ui5H— sonu sood (@SonuSood) August 6, 2024
या व्हिडिओमध्ये एका बांगलादेशी भारतीय महिलेने तिची वेदना व्यक्त केली आणि बांगलादेशमध्ये हिंदू नरसंहार कसा होत आहे आणि तिला आपला जीव वाचवण्यासाठी भारतात जायचे आहे हे तिने सांगितले आहे.
हे देखील वाचा- सोनू सूदचा Abs दाखवतानाचा फोटो इंटरनेटवर झाला व्हायरल, चाहते झाले थक्क!
अभिनेत्याचे आगामी चित्रपट
‘दबंग’, ‘आर राजकुमार’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला सोनू सूद आता पुन्हा एकदा पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी त्याची जोडी जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहे. फतेह या चित्रपटात ही जोडी दिसणार आहे. 10 जानेवारीला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘फतेह’ या चित्रपटातून या अभिनेत्याने दिग्दर्शक म्हणून नवा प्रवास सुरू केला आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि विजय राज देखील मुख्यभूमीकेत दिसणार आहेत.